images (12).jpg
images (12).jpg 
नांदेड

बोगस बियाणे विक्री करणे भोवले; परवाना निलंबित

सुरेश घाळे


धर्माबाद, (जि. नांदेड) : शहरातील बी - बियाणे, कीटकनाशके व खताचे विक्रेते मे. ईनानी फर्टिलायझर्स यांनी ज्वारीचे बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली होती. या बाबत ‘सकाळ’मध्ये ‘बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक’ या मथळ्याखाली (ता. १२) मे रोजी बातमी प्रकाशीत करण्यात आली होती. या बातमीची दखल कृषी विभागाने घेतली. त्यानुसार ईनानी फर्टिलायझर्स दुकान तपासणीदरम्यान विविध प्रकारच्या त्रुटी आढळून आल्याने (ता. १५) जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे यांनी संबंधित ईनानी फर्टिलायझर्सच्या बियाणे विक्रीचा परवाना पुढील एक महिन्यासाठी अखेर निलंबित केला आहे. यामुळे बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

तेलंगणातील मुधोळ तालुक्यातील सालापूर येथील शेतकऱ्याला व धर्माबाद तालुक्यातील नायगाव (ध) येथील शेतकऱ्याला ज्वारीचे बियाणे बोगस दिल्याने ज्वारीला कणसेच लागली नव्हती. या बाबत सदरील शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी माधुरी उदावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती. बातमीच्या आधारे तालुका कृषी अधिकारी माधुरी उदावंत व पंचायत समितीचे कृषी अधिकारी विश्वास आधापुरे यांनी संयुक्त तपासणी केली. त्या वेळी रासायनियक खताचे कुठलेही दस्तावेज दुकानात आढळले नाही. शेतकऱ्यांच्या निविष्ठा तक्रारीबाबत फलेक्स लावले नसणे, रब्बी हंगामाचे वाण उन्हाळी हंगामासाठी देऊन फसवणूक करणे यासह साठा रजिस्टर नसणे, साठाफलक व भावफलक न लावणे, मासिक अहवाल सादर न करणे आदी स्वरूपातील आरोप कृषी सेवा केंद्राच्या चालकावर ठेवण्यात आले. उपरोक्त त्रूटींच्या आधारे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या दालनात (ता.आठ) जून रोजी सुनावणी घेण्यात आली.


ईनानी कृषी सेवा केंद्राचे ईनानी मूलचंद यांनी उपस्थित राहूनही आपला खुलासा समाधानकारक दिलेले नाही. त्यामुळे अटी व शर्थीचे उल्लंघन केले असल्याचे अखेर सिद्ध झाले. एकूणच ईनानी यांच्या या सर्व चुकीच्या बाबींमुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे यांनी ईनानी कृषी सेवा केंद्राचा बियाणे विक्रीचा परवाना (ता.१६) जून ते (ता.१५) जुलै २०२० पुढील एक महिन्यापर्यंत निलंबित केला आहे. यामुळे बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


शेतकऱ्यांची फसवणूक भोवली
शहरातील बी - बियाणे, कीटकनाशके व खताचे विक्रेते ईनानी यांनी ज्वारीचे बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे प्रकार अनेक वेळा घडले. मात्र, या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात होते. परंतु, शेतकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्यामुळे ‘सकाळ’ने या बाबत बातमी प्रकाशीत केली. बातमीच्या अनुषंगाने अखेर ईनानी फर्टिलायझर्सचा बियाणे विक्रीचा परवाना निलंबित झाला. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई झाल्यामुळे शेतकऱ्यांनी ‘सकाळ’चे आभार मानले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाने पाडलेलं हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार, पण कॅप्टन कमिन्स फटकेबाजीने मुंबईसमोर 174 धावांचं लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT