file photo 
नांदेड

शंकर नागरी बँक प्रकरण : पुन्हा एकाला गुजरातमधून अटक; विमानतळ व सायबर सेलच्या पोलिसांची कारवाई

प्रल्हाद कांबळे

नांदेड : नविन मोंढा परिसरातील शंकर नागरी सहकारी बँकेच्या आयडीबीआय शाखेतून साडेचौदा कोटी रुपयाचा अपहार करण्यात आला होता. हा प्रकार अज्ञात हॅकरने विविध खातेदारांच्या नावावर हे पैसे वळविली होते. मात्र नांदेड पोलिसांनी सायबर सेलच्या माध्यमातून जवळपास पंधराहून अधिक आरोपींना अटक केली. यात काही परदेशी महिलांचाही समावेश आहे. पुन्हा एकदा विमानतळ पोलिसांनी गुजरातमधून एकाला अटक केली. 

शंकर नागरी सहकारी बँकेच्या आयडीबीआय शाखेतून १४ कोटी ५६ लाख रुपये हॅक करुन अनेक खातेदारांच्या नावे वळविले होते. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली होती. याबाबत वजिराबाद पोलिस ठाण्यात बँक सरव्यवस्थापकांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्याकडे देण्यात आला. पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला. 

दाखल झालेल्या गुन्ह्यात आजपर्यंत काही विदेशी, देशी अशा १४ पुरुष आणि महिलांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या वतीने विमानतळ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी या गुन्ह्यात यापूर्वीही मुंबई येथून काही आरोपींना अटक करुन आणले होते. सध्या अटक सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. पुन्हा या पथकाने सायबर सेलच्या फौजदार अनिता चव्हाण, श्री. आलेवार, प्रविण राठोड यांच्या मदतीने गुजरातच्या वापी जिल्ह्यातील चंदन प्रेमसिंग राय ( वय 36) रा. हाउस नंबर १०१,पन्नालाल की चावल, जेके किराना जवळ, जिल्हा वलसाड (गुजरात) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५३ हजार २०० रुपये रोख, बँक एटीएम, पासबुक जप्त करुन वापी न्यायालयातून हस्तांतरण प्राप्त करुन नांदेडला आणले आहे. सोमवारी (ता. २२) सकाळी वजिराबाद पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Megablock: रविवारी प्रवाशांचे हाल होणार! सर्व रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; लोकलच्या वेळापत्रकात बदल; पाहा वेळापत्रक

Chha.Sambhaji Nagar News: मंत्री, नेत्यांची खुशमस्करी करण्यासाठी सर्वसामान्यांच्या ३४ बस धूळखात !

प्रत्येक कथा ही सोपी उत्तरे देण्यासाठी नसते... मृणाल ठाकूर- हुमा कुरेशी यांच्या 'पूजा मेरी जान'ची चर्चा

Divorce Petition :‘काळा रंग, जाडजूड शरीरयष्टी’वरून पत्नी टोमणे मारते; पतीने मागितला घटस्फोट, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

लग्नाला १२ वर्ष होतील तरीही मला कळलेलं नाही की... श्रेया बुगडेने सांगितलं नवरा निखिल सेठसोबत कसं आहे नातं

SCROLL FOR NEXT