hemant patil 
नांदेड

शिदोरी : तेरवीचा खर्च टाळून खासदार हेमंत पाटील, राजश्री पाटील यांच्याकडून अन्नदान

खासदार हेमंत पाटील यांच्या सासू व गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांच्या मातोश्री तथा यवतमाळ येथील पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष कै. बाबासाहेब महल्ले यांच्या पत्नी कै. पुष्पाताई महल्ले यांचे ता. 27 एप्रिल रोजी कोरोना आजाराने मुंबई येथे निधन झाले होते.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : हिंदू धर्मातील एक असलेल्या संस्कारपैकी तेरवीचा अनाठायी खर्च टाळून त्या खर्चातून गरजू रुग्ण नातेवाईकांना अन्नदान देण्याच्या उद्देशाने खासदार हेमंत पाटील (Mp Hemant Patil) व गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी शिदोरी या सामाजिक उपक्रमाची सुरवात केली आहे. महाराष्ट्र दिनापासून या उपक्रमाला श्री. गुरु गोविंदसिंग शासकीय रुग्णालयात (Government hospital) सुरवात करण्यात आली आहे. Shidori: Food donations from MPs Hemant Patil and Rajshri Patil, avoiding the cost of Teravi

याप्रसंगी खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकार, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद तिडके बोंढारकर, उमेश मुंडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, उपजिल्हाप्रमुख प्रदीप उर्फ पप्पू जाधव, प्रवीण जेठेवाड, शहरप्रमुख तुलजेश यादव, शहर संघटक अवतारसिंग पहरेदार, गौतम जैन, शैलेशसिंह रावत यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा - जगताना समाजभान राखायचं... चळवळीत उतरायचं आणि प्रत्यक्ष मैदानात यायचं, हे मराठी माणसाचे वैशिष्ट्यं.

खासदार हेमंत पाटील यांच्या सासू व गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांच्या मातोश्री तथा यवतमाळ येथील पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष कै. बाबासाहेब महल्ले यांच्या पत्नी कै. पुष्पाताई महल्ले यांचे ता. 27 एप्रिल रोजी कोरोना आजाराने मुंबई येथे निधन झाले होते. शासनाच्या सर्व नियमाचे पालन करुन मुंबई (वरळी ) येथील मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंदू धर्मात मृत्यूनंतर तेरवी संस्काराला महत्व आहे. परंतु खासदार हेमंत पाटील आणि राजश्री पाटील यांनी या कार्यक्रमावर होणारा अनाठायी खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबविण्याचे ठरविले. जेणेकरुन समाजातील गोरगरीब जनतेला याचा लाभ झाला पाहिजे.

सध्या सगळीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. बाहेरुन गावावरुन आलेल्या रुग्णांचे आणि नातेवाईकांचे जेवणाअभावी प्रचंड हाल होत आहेत. त्यांना मदत व्हावी या दृष्टीकोनातून नांदेड आणि हिंगोली येथील रुग्णालयात दररोज एक हजार रुग्ण नातेवाईकांना जेवणाची व्यवस्था करण्यासाठी " शिदोरी " या सामाजिक उपक्रमाला सुरवात करण्यात आली. सकाळी 10 ते एक आणि सायंकाळी सहा ते आठ या वेळेत जेवण दिले जाणार आहे.

येथे क्लिक करा - भोर शहरातील कोरोनाग्रस्तांचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने शहरात कडक लॉकडाऊन घोषीत केला

मागील महिनाभरापासून नांदेड आणि हिंगोली येथे शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. व त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक सुद्धा आहेत. त्यांच्या जेवण, झोपायची कुठेच सोय नसल्याने प्रचंड हाल होत आहेत. अश्या गरजू गोरगरीब रुग्णाच्या नातेवाईकांची भूक मिटविण्यासाठी व त्यांची हेळसांड होऊ नये म्हणून श्री गुरु गोविंदसिंग कोविड रुग्णालय नांदेड येथे वरण- भात, भाजी- पोळीची सुविधा करण्यात आली आहे. ज्यांची कुठेही जेवणाची सोय नसेल अश्या गरजू नातेवाईकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन खासदार हेमंत पाटील आणि राजश्री पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT