shiv sena Anil Desai Subhash Wankhade meet up Matoshri nanded sakal
नांदेड

अनिल देसाई - सुभाष वानखडेंची सदिच्छा भेट

दोन नेत्यांची झाली भेट; अडीच दशकांच्या जुन्या मैत्रीला उजाळा

गजानन पाटील

हदगाव : शिवसेना संपर्क अभियान दौऱ्यात शिवसेना नेते अनिल देसाई यांनी माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट दिली. या दोन्ही नेत्यांच्या अडीच दशकाच्या मैत्रीला यानिमित्ताने उजाळा मिळाला.माजी खासदार सुभाष वानखेडे यांची मुंबईच्या मातोश्रीवर एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख होती आणि आजही आहेच. मागील तीस वर्षांपूर्वी वानखेडे यांनी शिवसेना मतदारसंघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. त्या दरम्यान शिवसेनेचा झंझावात ठेवत वानखेडे यांनी सतत वीस वर्ष मतदारसंघावर अधिराज्य गाजवले होते. सलग तीन वेळा हदगावचे आमदार व एक वेळा हिंगोलीचे खासदार म्हणून त्यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. मुंबई वरून शिवसेना नेते मतदारसंघात येत असतात त्या वेळी माजी खासदार वानखेडे यांची भेट आवर्जून घेतात.

शिवसंपर्क अभियानातंर्गत नांदेड जिल्ह्यात खासदार देसाई यांच्या हदगाव दौऱ्यात त्यांनी वानखेडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. वानखडे यांनीही त्यांचा सत्कार केला आणि या दोन्ही नेत्यांच्या भेटीने सुमारे अडीच वर्षाच्या दशकातील मैत्रीला उजाळा मिळाला. दोघांची जुनीच मैत्री असल्याने या दोन्ही नेत्यात दिलखुलास चर्चा झाल्याची बघावयास मिळाली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे शिवसैनिकांनी देखील समाधान व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, प्रकाश मारावार आदींची उपस्थिती होती.

भेटीने अनेकांच्या उंचावल्या भुवया

माजी खासदार वानखेडे यांचे शिवसेनेच्या नेत्यांसोबत जिव्हाळ्याचे व मैत्रीपूर्ण संबंध असल्याने मतदारसंघात आलेले सेनेचे नेते माजी खासदार वानखेडे यांची मित्र म्हणून आवर्जून भेट घेतात. त्याच मैत्रीला उजाळा देण्यासाठी शिवसेना नेते देसाई यांनी वानखेडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. ही कुठलीही राजकीय भेट नसताना देखील काही जणांच्या या भेटीने भुवया उंचावल्या असल्याचेही बघावयास मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT