Shiv Sena chief Balasaheb Thackeray was worshiped at Nanded on the occasion of Memorial Day.jpg 
नांदेड

नांदेड येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शिवसेनाप्रमुख, हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतीमेस अभिवादन केले. वजिराबाद परिसरातील उपजिल्हाप्रमुख प्रदीप उर्फ पप्पू जाधव यांच्या निवास्थानी मराठवाड्यातील पहिला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या असलेल्या अर्धाकृती पुतळ्यास जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद बोंढारे, उमेश मुंडे, प्रदीप जाधव यांच्यासह शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

जिल्ह्यात काही ठिकाणी रक्तदान शिबिर तर काही ठिकाणी रुग्णांना फळ वाटप तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. आसना बायपास येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. यावेळी उपशहरप्रमुख रमेश पाटील कोकाटे, विभाग प्रमुख माधव पाटील कोकाटे, पिंपळगाव तालुका अर्धापूर येथील माजी पंचायत समिती सदस्य तथा पिंपळगावचे सरपंच बालाजी कल्याणकर, अमोल राठोड, श्रीराम कोकाटे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

बाळासाहेब ठाकरे हे आमचे वंदनीय असून त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शिवसेना वाढीचे प्रयत्न करत असून येणाऱ्या काळात गाव तिथे शिवसेना शाखा व घर तिथे शिवसैनिक हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे दत्ता पाटील कोकाटे यांनी सांगितले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

Air Force Recruitment 2025 : बारावी पास विद्यार्थ्यांसाठी हवाई दलात सामील होण्याची ‘सुवर्ण संधी’ !

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT