Nanded Photo 
नांदेड

देशभरातील १५ संशोधकांच्या यादीत नांदेडच्या शिवराज नाईकची निवड; या आजारावर केले महत्वपूर्ण संशोधन

शिवचरण वावळे

नांदेड : येथील कंधार तालुक्यातील कल्हाळी गावातील शिवराज नाईक या विद्यार्थ्याने ‘नॅनो टेक्नॉलॉजी’ पद्धतीने ‘अल्झायमर’ या आजारावर प्रभावी औषधोपचार व्हावा यासाठी ‘इंट्रोनेसल स्प्रे’वर संशोधन करून मोठे यश संपादन केले आहे. त्यांच्या या संशोधनाची नुकतीच ‘गांधीयन यंग इनोव्हेशन’ ॲवॉर्डसाठी निवड झाली आहे. 

मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील कल्हाळी या ऐतिहासिक गावातील शिवराज नाईक यांचे वडील महामंडळात बसवाहक म्हणून कार्यरत होते. अतिशय कमी पगाराची नोकरी असली तरी, त्यांनी मुलास शिक्षणात कुठेच कमी पडू दिले नाही. जिथे वडील कमी तिथे शिक्षक असलेले काका डी. बी. नाईक नेहमी शिवराज यांच्या मदतीला धावून येत. काकाच्या मदतीने शिवराज यांनी पहिले ते दहावीपर्यंतचे शिक्षण बाबानगर येथील महात्मा फुले हायस्कूल येथे पूर्ण केले. 

‘अल्झायमर’ या आजारावर नॅनोटेक्नॉलॉजीवर आधारित ‘इंट्रोनेसल स्प्रे’

लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या शिवराजने पुढे अहमदनगर येथे अकरावी, १२ वीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१० ला कराड येथे बी. फार्मसीला प्रवेश घेतला. पुढे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून २०१३ मध्ये एम. टेक.चे शिक्षण पूर्ण करून इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई येथे पीएच.डी.साठी रजिस्ट्रेशन केले व आतापर्यंत केवळ तोंडावाटे घेण्यात येत असलेल्या चार द्रव औषधांना शासनाची मान्यता असलेल्या ‘अल्झायमर’ या आजारावर पहिल्यांदाच नॅनोटेक्नॉलॉजीवर आधारित ‘इंट्रोनेसल स्प्रे’ हे नाकाद्वारे घेण्याच्या औषधावर महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. 

नावीन्यपूर्ण प्रकल्पाच्या सादरीकरण 

त्यांनी केलेल्या या औषधीवर दीड ते दोन वर्षापासून उंदीर व ससा या प्राण्यांवर प्रयोग सुरू होते. या यशस्वी प्रयोगानंतर प्राथमिक आणि द्वितीय स्तरावरदेखील या संशोधनाची चाचणी करण्यात आल्यानंतर गांधीयन यंग टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन ॲवॉर्डसाठी विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण प्रकल्पाच्या सादरीकरणासाठी दिला जाणारा गांधीवादी यंग टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन पुरस्कारासाठी थेट आॅनलाइन पद्धतीने मुलाखत घेऊन शिवराज नाईक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मार्चमध्ये फेस्टिव्हल ऑफ इनोव्हेशनदरम्यान अध्यक्ष तथा देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १५ लाख रुपयांचा हा पुरस्कार दिला जाणार आहे. 

अल्झायमर  रुग्णावर थेट परिणाम
अल्झायमर या आजारावर १९१० मध्ये संशोधन झाले. आतापर्यंत यादरम्यान चार द्रव औषधोपचारास शासनाची मान्यता मिळाली आहे. ही सर्व औषधे तोंडावाटे दिली जातात. ती औषधे थेट मेंदूपर्यंत पोहचण्यात काही अडथळे येतात. त्यामुळे उपलब्ध औषधांचा रुग्णावर थेट परिणाम दिसून येत नाही. मी नॅनोटेक्नॉलॉजीवर आधारित नाकाद्वारे औषध देण्यासाठी ‘इंट्रानेसल स्प्रे’ची निर्मिती केली आहे. ते अल्झायमर रुग्णांच्या थेट मेंदूपर्यंत पोहचून तत्काळ परिणामकारक ठरण्यात यशस्वी होत असल्याचे सिद्ध झाले आहे. 
- शिवराज नाईक, संशोधक विद्यार्थी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं विसर्जन मिरवणुकीत ढोलवादन

'दारू-सिगरेट पीते', शिल्पा शेट्टीबद्दल सासऱ्यांची धक्कादायक वक्तव्य, राज कुंद्राचा खुलासा

Ganesh Visarjan 2025 : श्री विसर्जनादरम्यान लेंडी नदीत देगावचा तरुण बुडाला; देगाव येथे शोकाकुल वातावरणात शनिवारी अंत्यसंस्कार

India's All-Time T20I XI : रोहित, विराट, सूर्या संघात; कर्णधार मात्र वेगळाच, आशिया चषकापूर्वी पाहा भारताचा ऑल टाईम ट्वेंटी-२० संघ

SCROLL FOR NEXT