corona.jpg 
नांदेड

धक्कादायक..! आमदाराच्या कुटुंबातील ९ जण पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात शनिवारी (ता.२७) सकाळी नांदेडचे एक कॉँग्रेसचे आमदार तर रात्री नऊ वाजता आलेल्या अहवालात अन्य १६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. विशेष म्हणजे, या १६ जणांमध्ये कॉंग्रेसच्या आमदाराच्या कुटूंबातील नऊ सदस्यांचा समावेश आहे. कोरोना बाधित माजी महापौर व त्यांचा नगरसेवक मुलगा यांच्या संपर्कात आल्यामुळे कॉँग्रेसचे एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.


शनिवारी रात्री आलेल्या अहवालात अन्य १६ जण पॉझिटिव्ह आले. यात कॉँग्रेसच्या आमदाराच्या कुटूंबातील नऊ सदस्यांचा समावेश आहे. त्यामध्ये एक पाच वर्षीय मुलगी आणि सहा वर्षीय मुलाचा समावेश आहे. दिवसभरात पंजाब कोविड केअर सेंटरमधील पाच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या ३६५ वर पोहचली आहे. तर २७५ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत एकूण १६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. 

कंधारला महिला डॉक्टर पाझिटिव्ह 
चार दिवसापूर्वीच तालुक्यातील चिखलभोसी येथे कोरोना पाझिटिव्ह रुग्ण सापडले होते. आता कोरोनाने शहरात शिरकाव केला आहे. शुक्रवारी (ता.२६) रात्री येथील खासगी दवाखान्यातील महिला डॉक्टरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कंधारला खऱ्या अर्थाने कोरोनाची लागण झाली असून चिखलभोसी व शहरात कोरोनाच्या शिरकावला लोहा व नांदेड येथील डॉक्टरांचा संपर्क कारणीभूत ठरला आहे. दरम्यान तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या दहा स्वॅब पैकी आठ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात एक जण पॉझिटिव्ह, सातजण निगेटिव्ह तर दोघांचा अहवाल प्रलंबित आहे.

सात जणांचा अहवाल निगेटिव्ह
(ता. १९) जून रोजी लोहा येथील खासगी रुग्णालयाचे डॉक्टर कंधार येथील एका खासगी रुग्णालयात सिजरिंग करण्यासाठी आले होते. (ता.२५) जून रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह निघाल्याचे समजताच घबराट पसरली. त्या दवाखाण्याचे पालिकेच्यावतीने निर्जंतुकीकरण करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद फिसके यांनी त्यांच्या टीमसह त्या खासगी रुग्णालयातील दोन डॉक्टर, पाच कर्मचाऱ्यांसह चिखलभोसी येथील महिलेच्या संपर्कात आलेल्या कंधार तालुक्यातील लाठी येथील दोन व नंदनवन येथील एक असे दहा जणांचे स्वॅब तपासणीसाठी नांदेडला पाठवले होते. त्यांचा अहवाल शुक्रवारी रात्री प्राप्त झाला. यात शहरातील त्या खासगी रुग्णालयातील महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या आहेत. तर इतर सात जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

* नांदेड जिल्हा
* एकूण पॉझिटिव्ह
- ३६५
* उपचार घेत घरी परतलेले - २७५
* उपचार सुरु - ७४
* मृत्यू - १६ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dam Water Level Rises : खडकवासला धरण वेगाने भरतंय... पुढचे काही तास ठरणार निर्णायक? प्रशासनाने नागरिकांना दिला महत्त्वाचा इशारा

मोठी बातमी! माध्यमिक शाळांमध्ये आता कला-क्रीडा-संगीत शिक्षकांची भरती; राज्यात यंदा १८ हजार शिक्षकांची भरती; रिक्त पदे अपलोड करायला १० जुलैपर्यंत मुदत

उजनीत ८१ हजार क्युसेकची आवक! पुण्यातील पश्चिम घाटमाथ्यावर दमदार पाऊस, 3 दिवसांत ‘प्लस’मध्ये येण्याची शक्यता; गतवर्षी धरण 27 मे रोजी प्लसमध्ये, वाचा....

Daliya Laddu Recipe:फायबरने भरपूर अन् पचायला हलके , १५ मिनिटांत तयार करा पौष्टिक दलियाचे लाडू

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

SCROLL FOR NEXT