file photo 
नांदेड

धक्कादायक : तेरा दिवसाच्या बालकाचे अपहरण 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पोटाची खळगी भरण्यासाठी येथील हजुर साहिब रेल्वेस्थानक परिसरात राहणाऱ्या एका तेलंगनातील दाम्पत्याचा तेरा वर्षाचा बालक अज्ञात आरोपीने पळवून नेले आहे. ही घटना ता. २६ मेच्या पहाटे एक ते अडीचच्या सुमारास रेल्वे स्थानक रस्त्यावर घडला. या प्रकरणी वजिराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध पत्रिका जारी केली आहे. 

तेलंगना राज्यातील नेहरुनगर- सारंगपूर, निझामाबाद येथील राहणारा शेख अक्रम शेख उमर (वय १९) हा पोटाची खळगी भरण्यासाठी कधी लातूर तर कधी नांदेड रेल्वेस्थानक परिसरात राहून मिळेल ते काम करतो. त्याला एक १३ दिवसाचा मुलगा होता. ता. २५ मे रोजी त्याने दिवसभराचे काम करुन तो अपल्या पत्नी व मुलासोबत रात्री रेल्वेस्थानक रस्त्यावर असलेल्या भंडारी इंटरप्रायजेससमोर झोपी गेले होते. काबाड कष्ट केल्याने मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्याजवळ अज्ञात आरोपीने जाऊन झोपेत असलेल्या त्या तेरा दिवसाच्या बालकाचे अपहरण केले.

ता. २६ मेच्या पहाटे अडीचच्या सुमारास या दाम्पत्याला जाग आली. पहातात तर त्यांचा मुलगा दिसला नाही. त्यांना एकदम धक्का बसला. त्यांनी लगेच आजूबाजूला व रेल्वेस्थानक परिसरात कोणी पळविला का म्हणून पहाणी केली. मात्र तो कुठेच दिसला नाही. अखेर या दामप्त्याने वजिराबाद पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी तपास फौजदार अमोल पन्हाळकर यांच्याकडे दिला. त्यांनी शोध सुरू केला मात्र अद्याप या बालकाचा शोध लागला नाही. शेवटी पोलिसांनी शोधपत्रिका काढली आहे. 

लहान मुलांना चोरणारी टोळी शहरात सक्रीय..?

नांदेड शहरात मागील काही दिवसांपासून लहान बालक, मुली, मुल व महिलांना पळवून नेण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकरणाच्या नोंदी संबंधीत पोलिस ठाण्यात करण्यात येत आहेत. मात्र प्रत्यक्ष एकही अपहरीत घटनेचा शोध पोलिसांना लागला नाही. बहुतेक लहान मुलांना चोरणारी टोळी शहरात सक्रीय झाली की काय असा संशय व्यक्त करण्यात येत असून पालक वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व संबंधीत पोलिस ठाण्याच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांनी याबाबत लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayushman Card : कोणताही प्रीमियम न भरता मिळवा फ्री Health Insurance, फक्त WhatsApp वर ‘Hi’ ... जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Kas Plateau Flower Season 2026 : कास पठारावरील फुलांचा हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरू; ऑनलाईन बुकिंग कधी? हुल्लडबाजी करणाऱ्यांना बसणार चाप

MSEDCL Bribe Case: रीलिज ऑर्डरसाठी लाचेची मागणी भोवली; महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला एसीबीने रंगेहाथ पकडले

Latest Marathi News Live Update : ऑगस्टमध्ये मराठवाडा आणि विदर्भ कोरडे; सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची आशा

'मी दादा कोंडकेसोबत 3 सिनेमे केले परंतु नंतर...'' अशोक सराफ आठवण सांगताना म्हणाले..'ते डबल मिनिंगकडे...'

SCROLL FOR NEXT