file photo 
नांदेड

धक्कादायक : डुकराला दगड मारल्याने चक्क महिलेला गळफास देण्याचा प्रयत्न

प्रल्हाद कांबळे

नांदेड : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डुकराला दगड का मारला म्हणून एका महिलेला मारहाण करून तिच्या घरात घूसुन तिच्याच साडीने गळफास देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुदैवाने या घटनेत ती महिला बचावली. हा धक्कादायक प्रकार हिमायतनगरच्या वडारगल्लीमध्ये गुरुवारी (ता. नऊ) सायंकाळी चारच्या सुमारास घडला. 

हिमायतनगर येथील एका महिलेनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डुकराला दगड मारल्याचा राग अनावर झाल्याने चक्क महिलेलाच गळफास देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, इळेगाव (ता. हिमायतनगर) येथील शंकर गणपत गायकवाड, राजू व्यंकटी गायकवाड, बालाजी उर्फ बाळू दशरथ यांनी संगनमत करुन आमच्या डुकराला दगड का मारला म्हणून त्या महिलेच्या घरी जावून वाद घातला. यानंतर तिला काठीने, लाथाबुक्यांनी जबर मारहाण करण्यात आली. 

हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

एवढेच नाही तर त्या महिलेला तिच्याच घरात ओढत नेऊन चक्क तिच्या साडीने पत्र्याच्या खालच्या लाकडाला गळफास देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला. पिडीत महिलेला लगेच नातेवाईकांनी हिमायतनगर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पीडीतच्या फिर्यादीवरुन शंकर गायकवाड, राजू गायकवाड आणि बाळू दशरथ या तिघांविरुद्ध घरात घुसून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. नऊ) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. एस. इंगळे करत आहेत. 

येथे क्लिक करानांदेडला १२ ते २० जुलै दरम्यान संचारबंदी होणार लागू, काय आहेत नियम, अटी वाचा...
 
विद्यूत शॉक लागल्याने एकाचा मृत्यू

भोकर : तालुक्यातील डौर शिवारात आपल्या शेतात काम करत असतांना शेतकऱ्याचा विजेच्या खांबाच्या तणाव्यातून उतलेल्या ताराला हात लागून शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. साईनाथ बाबाराव तोशटवाड (वय ५०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. नऊ) सकाळी सात वाजता डौर शिवारात घडली. मारोती विठ्ठल तोशेटवाड यांच्या माहितीवरुन भोकर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक श्री. कदम करत आहेत. 
    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT