file photo 
नांदेड

धक्कादायक : पुणे येथील पोलिस अधिकाऱ्यांच्या नावे बनावट खाते काढून नांदेडच्या पत्रकाराला पैशाची मागणी; सतर्कतेमुळे टळला अनर्थ 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : पुणे येथे कर्तव्यावर असलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नावे फेसबुकच्या माध्यमातून बनावट खाते तयार करुन त्यामार्फत नांदेडच्या एका पत्रकारास २१ हजाराची मागणी करण्यात आली. मात्र पत्रकारांच्या सतर्कतेमुळे या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकारी या प्रकरणाचा शोध घेत असून त्यांनी आपले फेसबुक अकाउंट बंद केल्याचे सांगण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यात काही वर्षापूर्वी कर्तव्य बजावून पुणे जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेले एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या नावे फेसबुकवर त्यांची फोटो अपलोड करुन सर्व बायोडाटा हॅक करुन बनावट खाते उघडले. संबंधित हॅकरने त्यांच्या नावाचा वापर करुन नांदेड येथील एका पत्रकारास बुधवारी ( ता. १० ) सकाळी फेसबुकच्या माध्यमातून चॅटिंग सुरु केली. सर्वप्रथम हाय, कैसे हो, असा संवाद सुरु केला. त्याला पत्रकारांनेही प्रतिसाद दिला. दोघांचा संवाद वाढत गेल्यानंतर हॅकरने मुझे पैसे की जरुरत है, मेरे बँक खातेमे २१ हजार रुपये दालो, मै आपको शाम को रिटर्न करुंगा, असे सांगितले. यासाठी त्याने बँक खातेक्रमांक, आयएफसी कोड दिला. परंतु हा प्रकार पत्रकारांच्या लक्षात आला. 

पुढील व्यक्ती हा हिंदीतून बोलत होता हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकारी हे अस्सल मराठीचे कवी असून ते हिंदीतून कसे काय बोलू शकतात. याचा त्यांना संशय आला. मात्र पुढच्या व्यक्तीस कुठलीही चाहूल न देता त्यांनी आपल्या बँक खात्यापर्यंत व अकाउंटमध्ये पैसे असलेल्यापर्यंत चर्चा नेली. अखेर हे हॅकरच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित पत्रकारांशी चॅटिंग करणे बंद केले. हा प्रकार पत्रकारांनी आपल्या एका सहकारी पत्रकारांच्या सहकार्याने संबंधित पोलिस अधिकार्‍यांना माहिती दिली. त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी लगेच बनावट खात्यावर आलेल्या मोबाईल क्रमांकाचा शोध सुरु केला असून खबरदारी म्हणून आपले फेसबुक खाते बंद केले आहे. तशा सुचना त्यांनी आपल्या फेसबुक मित्रांना दिल्या असून अशा प्रकारचे जर कोणाचे फोन आले तर त्याला बळी पडू नका असा संदेश दिला आहे. नागरिकांनीही अशा घटनांच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT