file photo 
नांदेड

धक्कादायक घटना : प्रेमसंबंध माहीत असलेल्या तरुणाचा प्रेमी युगलांकडून खून; नांदेडच्या कुडली येथील घटना

उमाकांत पंचगल्ले

हणेगाव ( जिल्हा नांदेड ) : अनैतिक प्रेम संबंध माहीत झाल्याने तो आपली समाजात बदनामी करेल किंवा पतीला सांगेल म्हणून त्याचा खून करणाऱ्या प्रेमी युगलांविरुद्ध मरखेल पोलिस ठाण्यात तब्बल एका महिण्यानंतर गुरुवारी (ता. २५) फेब्रुवारी रोजी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे बेसावध असलेल्या या प्रेमी युगलांना पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी (ता. २६) देगलुर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

देगलुर तालुक्यातील कुडली येथील शुभम मोहन चीमलपांडे याचे याच गावात राहणाऱ्या एका विवाहितेसोबत प्रेमसंबंध जुळले होते. हे संबंध जगदीश हणमंत जाधव (वय २७) या तरुणाला माहीत झाले होते. प्रेमसंबंधाचा जगदीश हा बोभाटा करेल किंवा घरच्या मंडळींना सांगेल या भितीने प्रेमीयुगल चिंताक्रांत झाले होते. शेवटी या दोघांनी संगनमत करुन जगदीश जाधव याचा खून करण्याचा कट रचला. ता. एक जानेवारी रोजी घरातून बाहेर पडलेला जगदीश जाधव हा त्यांच्या तावडीत सापडला. त्याला गावशिवारात नेऊन त्याच्या डोळ्यात तिखट टाकून गुप्तांगावर जबर मारुन खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाटी हा मृतदेह जंगलात फेकून दिला. जगदीश हरवल्याची नोंद ता. दोन जानेवारी रोजी मरखेल पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. 

तक्रारीच्या अनुषंगाने मरखेल पोलिस तपास करत असताना त्यांना कुडली शिवारातील चांदरबाई जाधव यांच्या शेतात एक मृतदेह आढळला. डोक्याची कवटी व शरिराचे इतर अवयव सडलेल्या अवस्थेत ता. २५ जानेवारी रोजी आढळून आले. मृतदेहाची नातेवाईकांकडून ओळख पटल्यानंतर त्याची हत्या की आत्महत्या याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला. तपासात जगदीश जाधव याचा खूनच करण्यात आला. असे पोलिसांच्या प्राथमीक तपासणीत पुढे आले. 

पोलिस उपाधीक्षक बिराजदार, सहाय्यक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी याबाबतची सविस्तर माहिती घेत अखेर मुख्य आरोपीपर्यंत पोहचले. जगदीश जाधव याचा शुभम चिमलपांडे आणि त्याची प्रियशी यांनी खून केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर ता. २५ फेब्रुवारी रोजी या प्रेमीयुगलावर मरखेल पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली. देगलुर न्यायालयाने सात दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT