फोटो 
नांदेड

मुदखेड सिआरपीएफ केंद्रात शॉपींग कॉम्पलेक्स

सकाळ वृत्तसेवा

मुदखेड : केंद्रीय सुरक्षा बल (सिआरपीएफ) केंद्रातील जवानांच्या परिवारासाठी लागणाऱ्या दैनंदिन साहीत्य खरेदीसाठी एकाच छताखाली शॉपींग कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात आली आहे. गुरूवारी (ता. दोन) कॉम्पलेक्सचे उद्घाटन सिआरपिएफचे पोलिस महानिरीक्षक राकेशकुमार यादव यांचे हस्ते करण्यात आले.या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणुन केंद्रीय रिजर्व पोलिस बल महीला परिवार कल्याण असोशिएशनच्या क्षेत्रीय अध्यक्षा सपना यादव या होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन केंद्राचे प्राचार्य बि. विर राजु हे होते.

गुरूवारी उद्घाटन झालेल्या शॉपींग कॉम्पलेक्समधील दुकान सिआरपीएफ केंद्र उभारणीसाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या, त्यांना प्राधान्य देण्यात येणार असून या शॉपींग कॉम्पलेक्समध्ये जवान व त्यांच्या कुटुंबांसह मुदखेड शहरातील नागरीकांना खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आज उद्घाटन प्रसंगी पोलिस महानिरिक्षक राकेशकुमार यादव यांनी सांगीतले.

पहिल्यांदा नियमात राहून सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन

कोरोना -१९ या विशाणुच्या आजारामुळे जगभरात लॉकडाऊन पाळण्यात आला या धरतीवर केंद्रामध्येही लॉकडाऊन पाळण्यात आला या काळात केंद्रात कार्यरत व वास्तव्यास असलेले जवान, त्यांचे परिवारास केंद्राच्या बाहेर जाऊ दिले नाही. व बाहेरील व्यक्ती आत घेतला गेला नाही. गुरुवारी पहिल्यांदाच या केंद्रात अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन शासनाच्या सर्व नियमांच्या आधिन राहुन करण्यात आले होते.
 
"गोदावरी शॉपिंग कॉम्पलेक्स "

मराठवाड्यात देशातील मुख्य व ऐतिहासीक वारसा असलली गोदावरी नदी वाहत असल्याने मराठवाड्याला या नदीचा मोठा फायदा होतो. या कॉम्पलेक्सला "गोदावरी शॉपिंग कॉम्पलेक्स " हे नाव देण्यात आले असल्याचे यादव यांनी सांगितले. शहरातील जनतेलाही या शॉपिंग कॉम्पलेक्समध्ये खरेदीसाठी लवकरच परवानगी दिली जाणार. शहरातील नवयुवक पोलिस किंवा सुरक्षा विभागात भरती होण्याची इच्छा ठेवत असेल तर अशा तरूणांना भरती पुर्व प्रशिक्षण ही या केंद्राच्या माध्यमातुन देण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असुन अशा तरूणांनी केंद्राशी संपर्क करावा असे आवाहन देखील या वेळी यादव यांनी केले.

यांची होती उपस्थिती

या वेळी डेप्टी कमांडन्ट पुरुषोत्तम जोशी, कपील बेनिवाल, समिर कुमार राव, जगन्नाथ उपाध्याय,रूपेश कुमार, सहाय्यक कमांडन्ट पुरुषोत्तम राजगडकर,डॉ. सरफराज यांचे सह केंद्रात कार्यरत असलेले अधिकारी, जवान, प्रशिक्षक व त्यांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थीत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT