File photo 
नांदेड

नांदेड : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शाळांचे महत्त्वपूर्ण योगदान

प्रमोद चौधरी

नांदेड : समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर, सर्वदृष्टीने अत्यंत मागास असलेल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना मुख्य समाज प्रवाहात सामील करण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या विविध प्रयत्नात राज्यातील नामांकित इंग्रजी शाळांचे खूप मोठे कल्याणकारी योगदान आहे. या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या जवळपास ५७ हजार विद्यार्थ्यांचा शैक्षणिकस्तर उंचावल्याचे दिसून येत आहे. 

आदिवासी समाजातील आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण दूर व्हावे, त्यांच्या बालकांना समाजातील इतर वर्गाच्या विद्यार्थ्यांबरोबर राहून शिक्षण घेण्याची आणि विकासाची समान संधी उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने मराठी माध्यमांच्या निवासी शाळा सोबतच शैक्षणिक वर्ष २०१०-११ पासून इंग्रजी माध्यमांचे उत्कृष्ट शिक्षण देणाऱ्या नामांकित इंग्रजी शाळा उपलब्ध करून दिल्या आहेत. शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे शासनाने या शाळांची निवड केली असून आजघडीला राज्यातील नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जवळपास ५७ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

शासनाकडुन देण्यात येणा-या व इतर योजनेच्या तुलनेत अत्यंत नाममात्र शुल्कातून विद्यार्थ्यांना अत्यंत दर्जेदार निवासी व्यवस्था, सकस आहार, शालेय गणवेश, स्वच्छता प्रसाधने, वैयक्तिक साहित्य, पाठ्यपुस्तके सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य, वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक सहली, विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयापासून ते शाळेपर्यंत ने-आण करण्याची सुविधा इत्यादी अनेक बाबी उपलब्ध करून दिल्या जातात. 

राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आदिवासी विभागाकडून इंग्रजी शिक्षणाबरोबरच शासकीय आश्रम शाळा, सैनिकी शाळा, अनुदानित आश्रम शाळा चालविल्या जात आहेत. अशा शाळांसाठी दीड ते दोन लाख रुपये अनुदान दिले जाते. शासनाने नव्यानेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकलव्य पब्लिक स्कूल सुरू केली असून या शाळांनाही दरवर्षी प्रति विद्यार्थी एक लाख तीस हजार रुपये अनुदान देण्यात येते. 

योजनेचा लाभ घ्यावा 
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी या शासनाच्या यशस्वी योजनेमध्ये सहभागी होऊन, आदिवासी विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व इतर प्रगत समाजातील विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा. 
- भास्करराव पाटील खतगावकर, अध्यक्ष (नामांकित इंग्लिश स्कूल ट्रस्टीज् असोसिएशन) 

गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते 
आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने सुरू केलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये तुल नात्मक दृष्ट्या नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळातून अत्यंत कमी खर्चात उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असल्याने शासनाच्या योजनेचे फलित दिसून आले आहे. 
- शिवाजीराव पाटील कव्हेकर, सचिव (नामांकित इंग्लिश स्कूल ट्रस्टीज् असोसिएशन)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT