File photo 
नांदेड

साहेब, कोरोनाने नव्हे तर पीपीई किटने मरु 

प्रमोद चौधरी

नांदेड ः जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पीपीई कीटचाही वापर वाढला आहे. मात्र, या कीटचा आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. अशातच तापमानाचा पारा वाढल्याने पीपीई कीट परिधान करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहा ते सात तास प्यायला पाणीही मिळत नाही. अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांना कोरोनाने नव्हे, तर पीपीई कीटच जीवघेणी ठरत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने पीपीई कीटचाही वापर वाढला आहे. कोविड वार्डात रुग्णसेवा देणाऱ्या प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांनाही सहा ते सात तास पीपीई कीट परिधान करावी लागत आहे. त्यामुळे एकदा पीपीई कीट परिधान केल्यावर या कर्मचाऱ्यांना पाणी देखील पिणे शक्य होत नाही. 

दुसरीकडे जिल्ह्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. पीपीई कीटचे कापड प्लास्टिकच्या आवरणाने आच्छादलेले असल्याने त्यातून वाराही जात नाही आणि पाणीही पिता येत नाही. त्यामुळे पीपीई कीट परिधान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात घाम येणे, घशाला कोरड पडणे, हातापायाला व्रण येणे, चक्कर येणे, युरिन इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, थकवा आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात उन्हाचा पारा हा ४१ अंश सेल्सिअसवर गेल्याने पीपीई कीट परिधान करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समस्येत वाढ होतांना दिसत आहे. 
  
कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा 
सद्यस्थितीत स्वतःच्या सुरक्षेसाठी पीपीई कीट अनिवार्य आहे. मात्र या किटमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. कारण या किटमधून हवा अजिबात शरीरापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे सलग एका कर्मचाऱ्याकडे हे काम न देता टप्प्याटप्प्याने देण्याची मागणी होत आहे. शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देऊन समस्या सोडविण्यासाठी पावले उचलावीत. जेणेकरून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल. 

खासगी रुग्णालयांना पीपीई कीटचा विसर
शासकीय रुग्णालयातील कर्मचारी नियमित पीपीई कीटचा वापर करत असून, त्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये पीपीई कीटचा वापर होत नसल्याने तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात ठेवून कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करावे लागत आहे. ‘‘आमच्या दवाखान्यामध्ये ५०वर कर्मचारी आहे. प्रत्येकाला पीपीई कीट देणे आम्हाला परवडत नाही. कारण, पीपीई किटचा एकाचवेळी वापर करावा लागत असल्याने त्यावरील दररोजचा खर्च परवडत नाही’’, अशी प्रतिक्रिया एका रुग्णालयातील डॉक्टरने दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather Update : मुंबईसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे, कसं असेल तापमान? हवामान विभागाने दिली माहिती

म्हाडा ३० हजार घरे उभारणार, राज्य सरकारकडे १०० एकर जागेसाठी पाठपुरावा सुरू

वडील समजून दुसऱ्यावरच अंत्यसंस्कार; हत्या करून जाळून फेकलेल्या मृतदेहाचे रहस्य कायम

Jintur accident news: जिंतूरजवळ भीषण अपघातात वसमतचे मामा-भाचा ठार; शहरात शोककळा, बाजार बंद

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

SCROLL FOR NEXT