file photo 
नांदेड

बहीण- भावाच्या प्रेमाचा दोर, शिमग्याचा हार; इंटरनेट काळातही माहेरवासिनीचे भावाच्या वाटेकडे लक्ष

चंद्रकांत सुर्यतळ

बरबडा (  जिल्हा नांदेड ) : बरबडा व परिसरात बहीण- भावाच्या नात्याचा दोर अजून मजबूत करणाऱ्या शिमग्याच्या हाराला या वर्षीही  मागणी आहे मात्र कोरोनचे सावट आहे. आथिर्क संकट उभे राहिले आहे.
 
इंटरनेटच्या जगात रोजचे दिवसच सणासारखे झाल्यामुळे तो पूर्वीचा उत्साह राहिल्याचे दिसत नाही. कोणालाही लहान- सहान गोष्टींचे फारसे महत्त्व राहिले नाही. तरीही काळाच्या ओघात बहीण कितीही श्रीमंत घरची झाली तरी सिमगा सणाला भावाकडून न विसरता येणाऱ्या साखर- खोबरेच्या हाराची वाट पाहत बदलत्या काळात अजूनही थांबलेले नाही.

हेही वाचा - नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुक चुरशीची होणार
 
स्वत: च्या घरी कितीही श्रीमंत असली तरीही भावाच्या प्रेमाचा हार आला की ती आनंदी होते. भारतीय संस्कृतीला हजारो वर्षाचा इतिहास आहे. चालीरीती चालत आलेल्या आहेत. बहिण- भावाचे नाते घट करण्यासाठी भाऊबीज, राखीपोर्णिमा, नागपंचमी, शिमगा हे काही सण आहेत. 
व्यवहारातील कोणत्या गोष्टीमुळे किंवा न समज- गैरसमजामुळे दरम्यानच्या काळात बहीण भावाच्या नात्यात कटूता आली असली तरी बहिणीचा भावावर कितीही राग असला तरी पंचमीचे सणाला चोळी व सिमगा सणाला हाराच्या गाठी घेऊन भाऊ दारात उभा राहिला की बहीण सगळा रुसवा फुगवा विसरुन बाजूला सारत आपल्या भाऊरायाला आग्रह करत पुरणपोळी जेऊ घालते ही परंपरा पूर्वीपासून चालत आहे. ग्रामीण भागात आजही परंपरा चालत आहे. मात्र मागील वर्षआपासून कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे भाऊ बहिणीला फोन करुन कोरोनाचा संसर्ग आहे बाई मी याहीवर्षी येणार नाही मला माफ कर असे भाऊ भ्रमणध्वणीवरुन बहिणीला निरोप पाठवत आहेत. 

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT