कुंटुर ठाण्यांतर्गत जखमी झालेली महिला 
नांदेड

सख्ख्या बहिणीने फोडले बहिणीचे डोके; कुंटुर पोलिस ठाण्यात गुन्हा

तालुक्यातील सातेगाव येथील घटनेतील सख्ख्या बहिणीसह तिघांवर कुंटुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बिट हवालदार एस. एम. कुमरे यांनी दिली.

चंद्रकांत सुर्यतळ

बरबडा ( जिल्हा नांदेड ) : सातेगाव (ता. नायगाव) येथील रहिवासी असलेल्या बहिण्याच्या घरी नांदेड सराफा गल्ली येथील बहिण उसने पैसे मागण्यासाठी आली. देण्या- घेण्याच्या कारणावरुन वादावादी झाल्यामुळे येथील नातेवाईक असलेले नारायण माधव जाधव यांनी नांदेडच्या सदरील महिलेस तुझे कशाचे पैसे आहेत आम्ही तुझे पैसे देणे नाही म्हणून जयश्री सुधीर पाटील हिच्या डोक्यात चाकूने वार करत दगडाने मारहाण केल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना ता. १८ रोजी घडली.

तालुक्यातील सातेगाव येथील घटनेतील सख्ख्या बहिणीसह तिघांवर कुंटुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बिट हवालदार एस. एम. कुमरे यांनी दिली. या चार आरोपीपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली असून सखी बहिण आरोपीसह दुसरी एक महिला फरार असल्याचे ही कुंटूर पोलिसांनी सांगितले. सदरची घटना ता. १८ जुन २०२१ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान सातेगाव येथे घडली असून नांदेडच्या बहिणीने सदरील नातेवाईकास उसने पैसे दिले होते. असे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले. या वादावादीत जयश्री सुधीर पाटील हिच्या डोक्यात आरोपीने प्रथम जीवे मरण्याच्या उद्देशाने चाकू हाल्ला डोक्यावर चढवीला नंतर दगडाने मारहान करुन जखमी झाली आहे.

हेही वाचा - ज्या काळात "भाकरी" साठी उन्ह- थंडी- वारा याची पर्वा न करता घरापासून कोसोदूर ऊस तोडण्याससाठी जावं लागणाऱ्या गेनूबाई व लक्ष्मण चव्हाण दाम्पत्याचा मुलगा हजारो कुटुंबाला राशन देणाऱ्या "ऑर्डर " वर सही करतो

कुंटूर पोलिस ठाण्यात जयश्री सुधीर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सातेगाव येथील आरोपी नारायण माधव जाधव, शिवाजी गंगाधर जाधव, यांच्यासह महिला मीराबाई शिवाजी जाधव ही जयश्रीबाईची सख्खी बहिणी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आणि रुक्मीनबाई गंगाधर जाधव ह्या आरोपी आहेत. सदर घटने प्रकरणी कुंटूर ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक के. एस. पठाण यांच्या आदेशानुसार हवालदार एस. एम. कुमरे यांनी गुन्हा दाखल केला. तपास फौजदार दिनेश येवले करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT