महेश पाटील  सकाळ
नांदेड

नेत्याचे बॅनर लावण्यावरुन सहा जणांनी मिळून तरुणाचा केला खून

प्रल्हाद हिवराळे

उमरी (जि.नांदेड) : उमरी (Umari) तालुक्यातील निमटेक येथील नेत्याचे बॅनर लावण्याच्या कारणावरून  सहा जणांनी मिळुन गावातील एका तरुणाला बेदम मारहाण केले. या मारहाणीत तरणाचा उपचाराच्या दरम्यान मुत्यू झाल्याची घटना घडली आहे. महेश सुरेशराव पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे.आईच्या फिर्यादीवरून उमरी पोलिस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. निमटेक (ता.उमरी) (Nanded) येथील महेश सुरेशराव पाटील (वय २९) हा ९ ऑगस्ट रोजी शेतातून (Crime In Nanded) गावाकडे येत असताना आरोपी खुशाल मोहनराव पाटील, आदित्य खुशाल पाटील, सुनिता खुशाल पाटील, त्र्यंबक माधवराव पाटील, शैलेश त्र्यंबक पाटील, मारुती ऊफ मनोज अशोक पाटील आदीने महेश पाटील यांना घरी बोलावून सर्वांनी मारहाण केली. यावेळी एका आरोपीने महेशच्या डोक्यात बॅटने मारुन गंभीर जखमी केले. तर इतर जणांनी बेदम मारहाण केले.

या मारहाणीत महेश हा गंभीर जखमी झाल्याने उमरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी  उपचारा सुरू केले असता महेश कोमात गेला होता. त्याला नांदेडला घेऊन जा असे नातेवाईकांना सल्ला देण्यात आला. नांदेडवरुन परत नातेवाईकांच्या आग्रहा खातर तेलंगणा राज्यातील निझामाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता गुरुवारी (ता.१२) पहाटेच्या सुमारास महेश पाटील याचे निधन झाले. या प्रकरणी मृत महेश पाटील यांची आई कलावतीबाई सुरेशराव पाटील यांच्या फिर्यादीवरून उमरी पोलिस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांनी दिले.

या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी निमटेक येथे भेट देऊन माहिती घेतली. पुढील तपास पोलिस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रघुनाथराव शेवाळे तपास करित आहेत. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आले असुन यात आरोपी खुशाल मोहनराव पाटील व त्र्यंबक पाटील यांना अटक करण्यात आले असल्याचे माहिती पोलिसांनी दिले. महेश पाटील यांचा मुत्यू झाल्याने निमटेक येथे वातावरण ताणताणावा खाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT