नांदेड : शहरालगत गोदावरी नदीच्या काठावर ईदगाह मैदान परिसरात अंदाजे ६० किलो वजनाचे आणि ५० वर्षांचे कासव आढळून आले. 
नांदेड

नांदेडला सापडले ६० किलो वजनाचे कासव!

अभय कुळकजाईकर

नांदेड : शहरालगत गोदावरी नदीच्या (Govdavari River) काठावर ईदगाह मैदान परिसरात बुधवारी (ता. चार) दुपारी अंदाजे ६० किलो वजनाचे आणि ५० वर्षांचे कासव (Turtle) आढळून आले. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन कासव ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसापासून झालेल्या पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यात डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे(Vishnurpuri Dam) दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी (Nanded) सोडण्यात आले होते. त्यामुळे काही वन्यजीव पाण्याबाहेर येत आहेत. गोदावरी नदीकाठालगत देगलूर नाका भागात असलेल्या इदगाह मैदान परिसरात बुधवारी दुपारी अंदाजे ६० किलो वजनाचा कासव आढळून आला.

पुढे हा कासव पाण्याच्या वर आल्यामुळे येथील नागरिकांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आर. पी. झाडे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि दुर्मिळ कासवास ताब्यात घेतले.सदर कासव पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, तरुणांनी वनविभागाला याबाबत वेळीच माहिती दिल्याने दुर्मिळ कासवास जीवदान मिळाले. सदरील कासव हे नदीतून वाहत आले असून अंदाजे पन्नास वर्षाचे व साठ किलो वजनाचे आहे. त्यास वनविभागाने ताब्यात घेतले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. कावळे व वनपाल आर. पी. झाडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Rule From 1 August: 1 ऑगस्टपासून बदलणार अनेक नियम! LPG, रेल्वे तिकीट, बँकिंगसह 'हे' 5 मोठे बदल जाणून घ्या

महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर व्हायब्रेटर ठेवणं, हा बलात्कारच! केरळ उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, आरोपीची शिक्षा कायम...

Pune PMC School: शालेय विद्यार्थ्यांना धुवायला लावले नगरसेविकेचे पाय; पुण्यात गुरुपौर्णिमेनिमित्त धक्कादायक प्रकार

Hockey Jersey Controversy: हॉकी संघाच्या भगव्या जर्सीवरून वाद पेटला, अध्यक्षांना अंधारात ठेवून निर्णय घेतला... Email ने उडवली खळबळ; नेमका वाद काय?

Virar: निष्काळजीपणाचा कळस! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् नवजात बाळ तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं,...घटनेनं संताप

SCROLL FOR NEXT