Nanded News 
नांदेड

Video-स्मार्ट स्किल्स : मुलाखतीसाठी मनाची तयारी कशी कराल

प्रमोद चौधरी

नांदेड : मुलाखत ही विद्यार्थ्यांच्या ज्ञानापेक्षा अधिक दृष्टिकोनाचीच परीक्षा असते. माणसाचा दृष्टीकोन हा मनाच्या संस्कारावर अवलंबून असतो. म्हणून मुलाखतीची तयारी करणे म्हणजे विद्यार्थ्यांनी मनाची तयारी करणे होय. अगदी मनापासून मुलाखतीचे आव्हान स्वीकारणे, मुलाखतीचे तंत्र समजून घेणे व मुलाखतीदरम्यान स्वतःचा वेगळा ठसा उमटवणे यासाठीच लागतो मनाचा निग्रह.

स्पर्धापरीक्षेत मुलाखतीपर्यंत जाणे म्हणजे परीक्षेची अर्धी लढाई जिंकणे होय. या परीक्षेतील पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा व आकलनाचा कस लागतो. हे दोन्ही अडथळे जे विद्यार्थी लीलया पार करतात त्यांच्यासाठीच असतो मुलाखतीचा पुढचा महत्त्वाचा टप्पा. मुलाखत म्हणजे तरुणांना आंतर-बाह्य जाणून घेण्याची प्रक्रिया होय. यासाठीच तज्ज्ञ मुलाखतकाराची नेमणूक बोर्डाने केलेली असते. 

स्पर्धापरीक्षेच्या चाळणीतून तयार झालेला विद्यार्थी हा समाजातील सर्व आव्हानांना सामोरा जाणारा असावा. त्यांच्याकडून देशाची सेवा होताना कोणतीही कसर बाकी राहू नये, समाजासमोर एखादे संकट आले, तर हा अधिकारी संकटांना घाबरून लांब न जाता संकटाशी दोन हात करण्यासाठी सदैव मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असणारा असावा.

गोंधळाची स्थिती
मुलाखत आणि विद्यार्थ्यांच्या मनाचा गोंधळ याचे फार जवळचे नाते आहे. मुलाखतीसाठी पात्र ठरलो याचा आनंद काही काळातच पात्र विद्यार्थ्यांच्या मनाची हूरहूर वाढवतो. कारण आतापर्यंत विद्यार्थ्यांनी बोर्डाचे फक्त प्रश्न सोडवलेले असतात. पण मुलाखत ही समोरासमोर होणार असल्याने अनेकांच्या मनाचा थोडा गोंधळ उडतोच. या गोंधळाला मुलाखती बाबतचे काही समज व गैरसमज कारणीभूत ठरतात.

योग्य तंत्र शिका
गैरसमज जितके अधिक तितकी गोंधळाची स्थिती जास्त. म्हणून विद्यार्थ्यांनी मुलाखतीला जाण्याअगोदर ही गोंधळाची स्थिती घालवून मनाची पूर्ण तयारी करणे केव्हाही चांगले असते. मिळालेच्या वेळेचा उपयोग मुलाखतीचे योग्य तंत्र शिकण्यासाठी केल्यास मुलाखतीत नक्की यश मिळते.
- डॉ. हनुमंत भोपाळे, समुपदेशक नांदेड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT