File photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य बिघडले, आल्कधर्मी जमिनीच्या प्रमाण वाढले 

प्रमोद चौधरी

नांदेड :  मराठवाड्यातील सर्वाधीक पेरणीक्षेत्र असलेल्या नांदेड जिल्ह्यात जमिनीतील सेंद्रीय कर्ब ०.३० टक्क्यांपेक्षा खाली आले आहे. यामुळे जमिनी नापिक होवून उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या सोबतच आल्कधर्मी जमिनीचे प्रमाण वाढून स्फुरदाचे प्रमाणही घटत असल्यामुळे शेतकऱ्यांना रासायणीक खताचा संतुलित वापर करुन सेंद्रीय खताचा वापर करावा लागणार आहे. 

नांदेड येथील राष्ट्रीय केमिकल अॅंड फर्टीलायझर्स लिमीटेडच्या (आरसीएफ) माती परिक्षणातून ही बाब पुढे आली. येथील माती परिक्षण प्रयोग शाळेत २०१९- २० मध्ये नांदेड जिल्ह्यातील सहा हजार ५१४ शेतकऱ्यांच्या माती नुमन्याचे मोफत परिक्षण करुन त्यांना जमिन आरोग्य प्रत्रिकेचे वाटप करण्यात आले. यात मुख्य अन्नद्रव्य - नत्र, स्फुरद, पालाशचे सहा हजार १०५ नमुने तर लोह, तांबे, जस्त, मॅग्नीज या सुक्ष्म अन्नद्रव्यांचे ४०९ नमुने तपासुन समिनीची सामु, क्षारता व सेंद्रींय कर्बाची तपासणी करण्यात आली. यात तीन हजार ५६० नमुन्यात सेंद्रीय कर्बाचे प्रमाण ०.३० टक्क्यांच्या खाली तर दोन हजार ५०६ नमुने मध्यम प्रमाणात आले. केवळ ३९ नमुन्यात सेंद्रीय कर्बाचे प्रमाण अधिक आढळले. 

या सोबत मुख्य अन्न घटक असलेले स्फुरदचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. सहा हजार १०५ मातीच्या नमुन्यापैकी चार हजार ८५३ नमुन्यात स्फुरदचे प्रमाण कमी आढळले आहे. या भागात आम्लधर्मी जमिनीच्या प्रमाणातही वाढ होत आहे. यासोबतच सुक्ष्म अन्नद्रव्याच्या ४०९ नमुने तपासणीत लोहाचे प्रमाण कमी आले आहे. तर झिंक, मॅग्नीज व कॉपरचेही प्रमाण मध्यम असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पिकांना अन्नदव्याची उपलब्धता होत नसल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता शेती विषयातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. 

सेंद्रीय कर्ब म्हणजे काय? 
जमिनीची सुपिकता म्हणजेच सेंद्रीय कर्बाचे योग्य प्रमाण मानले जाते. जमिनीत ०.४१ ते ०.८० टक्के सेंद्रीय कर्बाचे प्रमाण असणे आवश्‍यक असते. हे प्रमाण ०.३० टक्क्यांच्या खाली आले तर जमिन पिक घेण्या योग्य नसल्याचे मानले जाते. सेंद्रीय खते, हिरवळीचे खते, कुजलेले शेणखत, जैविक खतांची मात्रा योग्य प्रमाणात दिल्यास सुपिकता वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

आरसीएफच्या माती परिक्षण प्रयोग शाळेत शेतकऱ्यांच्या माती परिक्षण करुन जमिन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात येते. यात २०१९ - २० मधील तपासणीत नांदेड जिल्ह्यातील जमिनीत सेंद्रीय कर्ब, स्फुरदचे प्रमाण घटल्याचे निष्पन्न झाले आहे. 
- केदारनाथ काचावार, उपप्रबंधक, विपणन भुमी परिक्षण प्रयोगशाळा, आरसीएफ, नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik: लग्नानंतर सासरचं नाव लावण्यावरून वाद, जबरदस्तीने गर्भपात अन् ३ कोटींची मागणी; महिला लोकप्रतिनिधीच्या डॉक्टर पतीला अटक

Mumbai-Bengaluru Vande Bharat: मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत स्लीपर’ पुणेमार्गेच; तिकिटाचे दर राजधानीपेक्षा २० टक्क्यांनी जास्त असणार..

Wardha News: पालिकेच्या स्वच्छता विभागाची शहरात मान्सूनपूर्व मोहीम; स्वच्छता सभापतींची नियोजनबद्ध आखणी : शहरातील नाले झाले परत प्रवाहित

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला; वाढते तेलदर आणि रुपयाच्या घसरणीने बाजार हादरला

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात पोलीस सुरक्षेत पेट्रोल पंपांवर इंधन तेल विक्री

SCROLL FOR NEXT