file photo 
नांदेड

‘अशा’ रुग्णांनी घ्यावी विशेष काळजी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत (ता. आठ) कोरोना बाधितांची संख्या ३८ वर पोचली आहे. यातील औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. त्यामुळे या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

गुरुवारपर्यंत होते ३५ रुग्ण पॉझिटीव्ह
कोरोना विषाणु संदर्भात गुरुवारी (ता. सात) सायंकाळी पाच वाजेपर्यंतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे ९२ हजार ८६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यात एक हजार ४४० रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी एक हजार ३२९ स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून ५१ व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. या स्वॅब पैकी ३५ व्यक्तींचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण एक हजार ४५७ क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींपैकी ४८२ व्यक्तींचा क्वारंटाईन कालावधीत पूर्ण झाला आहे.

दोन ठिकाणी उपचार सुरु 
पॉझिटिव्ह ३५ रुग्णांपैकी सहा रुग्ण डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड व पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे २२ रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उर्वरित सात पॉझिटिव्ह रुग्णांपैकी चार रुग्ण हे मृत झाले आहेत तर तीन रुग्ण फरार असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३५ पॉझिटिव्ह रुग्णाच्या नजीकच्या संपर्कातील ३०४ व्यक्तींपैकी २६५ रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या व्यक्तीपैकी २१८ व्यक्तींचे थ्रोट स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होत. त्यापैकी २१८ व्यक्तींचे थ्रोट स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आला आहे.

शुक्रवारी आढळले तीन पॉझिटीव्ह 
अबचलनगर येथे सुरुवातीस आढळून आलेल्या कोरोनाबाधितांच्या निकटवर्तीयांतील तीन जणांचे अहवाल शुक्रवारी (ता. आठ) पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली. यापैकी एक महिला व दोन पुरुष असून त्यांचे वय ३५ ते ३८ च्या दरम्यान आहे. या नव्या बाधित व्यक्तींमध्ये रविनगर (कौठा) येथील एक जण आहे. पहिल्यांदा या तिघांचेही अहवाल निगेटिव्ह आले होते. पण कोविड आजाराच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दुसऱ्यांदा त्यांचे स्वॅब घेतला असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कौठा परिसर सील करून सहावा कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत पुन्हा बिबट्याची दहशत, पीडीएमसी परिसरात दिसल्या पाऊलखुणा, वनविभागाकडून शोधमोहीम

राजुरा हत्याकांड प्रकरण पोलिसांसाठी लाजिरवाणी बाब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत कबुली, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Update : कुख्यात गुंड मंगेश मडावी पोलिसांच्या जाळ्यात,सुजातपूरमधून अटक, ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

Agriculture Loss By Rain : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; मुळशी तहसीलदार विजयकुमार चोबे यांचे आदेश

Pune News : निधी येऊनही शहरात पाणी का साठते? केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांकडून प्रशासनाची झाडाझडती

SCROLL FOR NEXT