Nanded News 
नांदेड

विशेष बातमी ः हाताला काम नाही व पोटाला अन्न नाही कसे जगायचे मायबाप, पालातील कुटुंबाची प्रशासनाला आर्त हाक 

प्रमोद चौधरी

नांदेड ः  जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी कडक लॉकडाउन लावला आहे. याची खरी झळ गोरगरीब, मजुरदार, हमाल, छोटे-मोठे व्यावसायीक यांना बसत आहे. आपले व आपल्या परिवाराचे पोट भरायचे कसे? हा यक्ष प्रश्न त्यांना भेडसावत आहे. 

तरोडा नाका ते वर्कशॉप रोडवर प्रतिभा व बबन चव्हाण हे घिसडी दांम्पत्य आपला पारंपारिक व्यवसाय करून आपले व कुटुंबाचे पालनपोषण करत आहेत. लॉकडाउनच्या पूर्वीची परिस्थिती चांगली होती. दररोजी ३०० ते ४०० रुपये मिळकत होत होती. त्यात कुटुंब व्यवस्थीतरित्या चालत होते. पण कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण आयुष्याची ‘दिशा’ बदलून ‘दशा’ झाली आहे. 

तरोडा नाका ते वर्कशॉप रोडवर हे दांपत्य पाल मांडून आपला व्यवसाय करत आहेत. शेतीची औजारे, कुऱ्हाड, कोयते, विळे, खुरपे, नांगर इत्यादी साहित्य शेवटण्याचे काम करतात. त्याचबरोबर बकऱ्याचे पाय भाजून देणे ही कामेही त्यांना मिळत होती. परंतु, लॉकडाउनमुळे ग्राहक फिरकत नाहीत. त्यामुळे ३० ते ५० रुपयांवर दिवस काढावा लागत असल्याची खंत चव्हाण दाम्पत्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली आहे. 

बबन चव्हाण म्हणाले की, ‘हाताला काम नाही व पोटाला अन्न नाही’ असे असलेतरी जगण्यासाठी असे दिवस काढल्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उरलेला नाही. कधी कधी तर भवनीसुद्धा होत नाही. यामुळे प्रपंच कसा चालवायचा? हा प्रश्न पडल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. गिऱ्हाईक येत नसल्याने उपासमारी होत आहे. शासनाने अशा परिस्थितीत आमच्या सारख्यांना मदत करावी, अशी मागणी या दाम्पत्याने व्यक्त केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT