star air service Nanded to start air services from March 31 Hyderabad Ahmedabad flights to start Sakal
नांदेड

Nanded News : नांदेडहून ३१ मार्चपासून विमानसेवेचा मुहूर्त; हैदराबाद, अहमदाबादला विमानसेवा सुरू होणार

नांदेडकरांसाठी अनेक महिन्यांपासून फक्त चर्चेत असलेल्या विमानसेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या ३१ मार्चपासून विमानसेवेला सुरवात होणार असून, नांदेड-हैदराबाद आणि नांदेड-अहमदाबाद ही सेवा स्टार एअर कंपनीच्यावतीने सुरू केली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nanded News : नांदेडकरांसाठी अनेक महिन्यांपासून फक्त चर्चेत असलेल्या विमानसेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या ३१ मार्चपासून विमानसेवेला सुरवात होणार असून, नांदेड-हैदराबाद आणि नांदेड-अहमदाबाद ही सेवा स्टार एअर कंपनीच्यावतीने सुरू केली जाणार आहे.

दरम्यान, नांदेडहून पुण्यासाठी विमानसेवा ता. २३ मार्चपासून सुरू होणार होती. पण, अजून निर्णय झाला नाही. नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळावरून नांदेड-हैदराबाद आणि नांदेड-अहमदाबाद विमानसेवेला येत्या ता. ३१ मार्चपासून नियमितपणे सुरवात होणार असल्याची माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली. शिवाय बंगळूर-नांदेड-जालंदर विमानसेवाही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘उडे देश का आम आदमी’ अर्थात ‘उड्डाण’ या महत्त्वाकांक्षी विमानसेवेतील नांदेड येथून अनेक विमानसेवा पूर्ववत सुरू होत आहेत. यासाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्र्यांकडे आणि केंद्रीय उड्डयन मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. त्यास यश आले असून, येत्या ता. ३१ मार्चपासून सुरू होत आहे.

‘स्टार एअर’चे असे असणार वेळापत्रक

अहमदाबाद-नांदेड ही विमानसेवा प्रत्येक आठवड्यातील सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि रविवारी अशी राहील. शिवाय याचवेळी प्रत्येक आठवड्यातील सोमवार, मंगळवार, गुरुवार, रविवारी हैदराबाद-नांदेड ही विमानसेवा सुरू होणार आहे.

हैदराबाद येथून सकाळी ७.५५ ला उड्डाण घेणारे विमान नांदेड येथे सकाळी ८.४५ मिनिटांनी पोचेल, तर परतीच्या प्रवासात नांदेड येथून दुपारी ४.३० ला उड्डाण घेणारे विमान हैदराबाद येथे सायंकाळी ५.२० पोचेल अशी माहिती देण्यात आली आहे.

पुणे विमानसेवेसाठी अजूनही साशंकता!

नांदेड ते पुणे विमान प्रवास सुरू होणार, अशी माहिती असताना विमान कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर अजूनही पुण्यासाठी बुकिंग सुरू झालेली नाही. त्यामुळे नांदेडकरांमध्ये नाराजीचा सूर आहे. अनेकजण गोंधळात असून सर्वात जास्त मागणीही पुण्यासाठी होत आहे.

नांदेडमधील विद्यार्थी तसेच नोकरदारवर्ग पुण्यात असतो. अडचणीच्या वेळी पुण्यात असणाऱ्या नांदेडकरांना लवकर नांदेडला पोचण्यासाठी किंवा नांदेडहून पुण्यात पोचण्यासाठी हवाई प्रवास सुरू झाला पाहिजे, इतर ठिकाणांपेक्षा पुणेसाठी हवाई प्रवास सुरू होणे गरजेचे वाटते.

— शिवम पाटील

नांदेड जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी हे पुण्यात शिक्षणासाठी वास्तव्यास असतात. येथील विद्यार्थ्यांना अनेकवेळा नांदेडसाठी प्रवास करावा लागतो. त्यामुळे पुण्यासाठी हवाई प्रवास सुरू व्हावा.

— मयूरी देशमुख.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction: कॅमेरॉन ग्रीनसाठी ऐतिहासिक बोली! KKR अन् CSK मध्ये जोरदार रस्सीखेच; बनला सर्वात महागडा परदेशी खेळाडू

Rupee Fall : ऐतिहासिक नीचांक! रुपया 91 पार; 1 डॉलर = 91.07 रुपये! कारण काय? महागाई वाढणार का?

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी

प्रेक्षकांना कसा वाटला 'वचन दिले तू मला' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात, 'एपिसोड छान होता पण...'

SCROLL FOR NEXT