किनवट तालुक्यात कापूस लागवड 
नांदेड

किनवटच्या शिवणी परिसरात कापूस लागवडीस प्रारंभ

किनवट तालुक्यातील शिवणी परिसरात रोहिण्यामध्ये चार ते पाच दिवस चांगला पाऊस झाल्याने या परिसरातील शेतकरी पेरणीत व्यस्त असल्याचे पहावयास मिळत आहेत.

विठ्ठल लिंगपूजे

शिवणी (जिल्हा नांदेड ) : किनवट तालुक्यातील शिवणी व परिसरात कापूस लागवड व सोयाबीन पेरणीला सुरुवात झाली आहे. शिवणी परिसरात रोहिण्यामध्ये पाऊस चांगलाच बसला असल्याने या परिसरात शनिवारपासून कापूस लावगड व सोयाबीनची पेरणी करतानाचे चित्र पहावयास मिळत आहे.

किनवट तालुक्यातील शिवणी परिसरात रोहिण्यामध्ये चार ते पाच दिवस चांगला पाऊस झाल्याने या परिसरातील शेतकरी पेरणीत व्यस्त असल्याचे पहावयास मिळत आहेत. कारण कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे शेतकरी घरीच असल्याने शेतकऱ्यांना लग्नकार्य करता न आल्याने या वर्षी आपल्या शेतातील कामे वेळेवर करता आली. नांगरटी, वखरणी, कचरा वेचणीची कामे पूर्ण करुन शेतकरी पावसाची वाट पाहत असताना या वर्षी रोहिणी नक्षत्रात पाऊस पडला. त्यामुळे शेती परेणीसाठी सज्ज करुन ठेवल्याने आता पेरणीला सुरुवात करण्यात आली आहे.

हेही वाचा - महावितरण कार्यालयास ठोकले कुलूप; शिवसेनेचे आंदोलन

मृग नक्षत्राच्या अगोदरच पेरणी होताना पाहावयास मिळत आहे. गेल्या वर्षी या भागातील शेतकऱ्यांना पावसाच्या खंडामुळे पेरणी वेळेवर करता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचा सामना करावा लागल्याने शेतकरी निराश झाला होता. त्यानंतर पाऊस कधी कमी तर कधी जास्त झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे शेतकऱ्यांना पेरणीच्या बियाणांसाठी तारेवरची कसरत करावी लागली. शेतकऱ्यांना कर्ज काढून आपल्या शेतात लागणारे बी- बियाणे खते यांची सोय करावी लागले.

कोरोनाच्या काळात हाताला काम धंदे नसल्याने जवळचे पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते यासाठी जमा केलेला पैसाही खर्च झाला. त्यामुळे आता पेरणीसाठी लागणारे बियाणे खते उसनवारी व कर्ज काढुन शेतीतील पेरणी करावी लागत असल्याचे बळीराजाकडुन बोलले जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT