नांदेड

नांदेड : गुरुद्वारा बोर्डास वाशिंग मशिन प्लॉटसाठी २५ लाखाची मदत

स्टेट बँक ऑफ इंडियाचा पुढाकार; या पुढील काळातही गुरुद्वारास सहकार्य

तेजस भागवत

स्टेट बँक ऑफ इंडियाचा पुढाकार; या पुढील काळातही गुरुद्वारास सहकार्य

नांदेड : गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब यांच्या वतीने वाशिंग मशिन प्लॉट लावण्यात येणार आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (state bank of india) वतीने सोमवारी (ता.२०) २५ लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाराष्ट्र सर्कलचे प्रमुख अजयकुमार सिंह यांच्या हस्ते गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक व सर्व सहा अधिक्षक यांना २५ लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी सर्व प्रथम गुरुद्वारा बोडाच्या वतीने अजयकुमार सिंह, अकुला श्रीनिवास यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. शिवाय नांदेड जिल्ह्याचे रिजनल मॅनेजर नवीनकुमार उपलवार यांचा शाल, सिरेपाव, पुष्प गुच्छ, स्मृतीचिन्ह व गुरुद्वारा साहिबची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये विशेष करून गुरुद्वारा श्री लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंघजी हे उपस्थित होते, त्यांचाही गुरुद्वारातर्फे सम्मान करण्यात आला.

सर्वप्रथम गुरुद्वारा बोर्डाचे वरिष्ठ सहायक अधिक्षक सरदार शरणसिंघ सोडी यांनी सर्वांचे स्वागत केले आणि स्टेट बँक ग्रुपचे आभार करून बँकेतर्फे वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नंतर गुरुद्वारा वोर्डाचे प्रभारी अधीक्षक से. गुरविंदर सिंघजी वाधवा यांनी आपल्या शुभेच्छा देऊन बोर्डाच्या वतीने स्टेट ग्रुपचे केलेल्या या सहकार्याबद्दल वोर्डाचे अध्यक्ष भुपिंदर सिंघजी मनहास सर्व सदस्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले अजयकुमार सिंह म्हणाले की, गुरुद्वारा बोर्डातर्फे करण्यात येणारे सर्व धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकिय सेवेबद्दल गौरव करुन गुरुद्वारा साहिब मध्ये सर्व धर्माच्या लोकांना समान मान देण्यात येते असे आपले मनोगत व्यक्त करून गुरुद्वारा बोर्डाचे आभार मानत यापुढेही स्टेट बँकेच्या वतीने असेच सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले. मंचलन मशरण सिंध सोडी यांनी सूत्रसंचालन केले. अकुला श्रीनिवास यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

Kerala Monsoon Update : माॅन्सूनचा केरळात पोहोचण्याचा मुहूर्त हुकला, महाराष्ट्रात कधी येणार? पुढील 2-3 दिवस काही भागात पावसाची शक्यता

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Latest Marathi News Live Update : ठाण्यात शिवसेनेवर भाजपचं दबाव तंत्राची चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT