file photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात या शहरातील फेरीवाले होणार आत्मनिर्भर...वाचा सविस्तर

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव (जिल्हा नांदेड) : केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यासाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी राज्यात करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून शहरातील फेरीवाल्यांना खेळते भांडवल म्हणून प्रत्येकी १० हजार रुपये पतपुरवठा करण्यात येणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी फेरीवाल्यांनी नगरपंचायत नायगाव येथे नावनोंदणी व अर्ज करावे असे आवाहन कार्यालयीन अधिक्षक संतराम जाधव यांनी केले आहे.

पथ विक्रेता अनौपचारिक नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. नगरवासीयांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे स्वस्त दरात वस्तू व सेवांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्याना पथविक्रेता, फेरीवाला, ठेलेवाला ई. नावाने विविध भागामध्ये ओळखले जाते. त्यांच्याद्वारे पुरवल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये उदा, भाज्या, फळे, तयार खाद्यपदार्थ, चहा, भजी, पाव, अंडी, कापड, वस्त्र, चप्पल, कारागीराद्वारे उत्पादित वस्तू, पुस्तके / स्टेशनरी इत्यादींचा समावेश होतो तर सेवेमध्ये उदा. केशकर्तन दुकाने, चर्मकार, पान दुकाने, कपडे धुण्याची दुकाने इत्यादींचा समावेश होतो. कोविड -१९ (साथीचा रोग) सर्वत्र पसरलेला असल्यामुळे आणि परिणामी टाळेबंदी मध्ये पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरित परिणाम केला आहे. बहुदा ते कमी भांडवलावर पथविक्री करतात आणि जे काही भांडवल त्यांच्याकडे होते तेही या टाळेबंदीमध्ये शिल्लक राहण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्याची आवश्यकता आहे.

ता. २४ मार्च २०२० रोजी व त्यापूर्वी शहरामध्ये पथविक्री करीत असलेल्या सर्व पात्र पथविक्रेत्यांना लागु

शहरातील पथविक्रेत्याना त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी योजना राबविण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये केंद्र शासनाने सूचना दिलेल्या आहेत. त्यानुषंगाने सदर योजना राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता, त्यानुसार सदर योजनेची अंमलबजावणीबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. सदर योजना ता. २४ मार्च २०२० रोजी व त्यापूर्वी शहरामध्ये पथविक्री करीत असलेल्या सर्व पात्र पथविक्रेत्यांना लागु असेल. नागरी पथविक्रेते १ वर्षाच्या परतफेड मुदतीसह रुपये १० हजारापर्यंत खेळते भांडवल कर्ज घेण्यास आणि त्याची दर महा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील. सदर कर्ज विनातारण असेल, विविध कालावधीमध्ये किंवा तत्पूर्वी परतफेड करणारे पथविक्रेते वाढीव मर्यादेसह पुढील खेळते भांडवलाच्या कर्जासाठी पात्र असणार आहेत. 

 कर्जाची परतफेड केल्यास ते ७ टक्के व्याज अनुदान मिळण्यास पात्र होतील
   
व्याजदर बँकेच्या प्रचलित व्याजदराप्रमाणे तसेच आर बी आय च्या मार्गदर्शक सुचनानुसार लागम राहील. सदर योजनेंतर्गत कर्जाचा लाभ घेणाऱ्या पथविक्रेत्यांनी विविध कालावधी मध्ये कर्जाची परतफेड केल्यास ते ७ टक्के व्याज अनुदान मिळण्यास पात्र होतील. व्याज अनुदानाची रक्कम अनुदानाच्या खात्यात तीमाहीप्रमाणे जमा केली जाईल. सदर योजने मध्ये डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल माध्यमातून व्यवहार करणाऱ्या विक्रेत्यांना कॅशबॅकची सुविधा देण्यात येत आहे. तरी सर्व पथविक्रेत्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. सविस्तर माहितीसाठी व नोंदणीसाठी नगर पंचायत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

संपादन-  प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT