rain.jpg 
नांदेड

हिमायतनगरमध्ये दमदार परंतु इतर मात्र प्रतिक्षा....

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मागील आठ दिवसापासून जिल्ह्यात तुरळक पाऊस होत आहे. गुरुवारी (ता. २५) जिल्ह्यात हिमायतनगर, भोकर तसेच बिलोली तालुक्यात पाऊस झाला. शुक्रवारी सकाळी (ता. २६) आठपर्यंत जिल्ह्यात एकूण ९९.९७ मिलिमीटर तर सरासरी ६.२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आजपर्यंत जिल्ह्यात पाऊस १५.१३ टक्क्यांवर पोचला आहे.

पावसाच्या दडीमुळे पेरणीची कामे खोळंबली
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पेरणीची कामे खोळंबली आहेत. जून महिन्यातील ता. १२ व ता. १३ तसेच ता. १६ तारखेला पाऊस झाला. यानंतर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली. पावसाच्या भरवश्यावर सुरु केलेल्या पेरण्यांची कामे खोळंबली आहेत. शुक्रवारी (ता. २६) सकाळी साडेआठपर्यंत भोकर तालुक्यात ११.२५, हिमायतनगर ४९.३३, बिलोली १४.४०, उमरी ३.६७, किनवट तीन, माहूर दोन, लोहा ३.७१, हदगाव २.७१,नायगाव ५.४०, मुखेड ३.७१ मिलीमीटर पाऊस झाला. ह

हिमायतनगर तालुक्यात चांगला पाऊस 
हिमायतनगर मंडळात ४७, सरसम ६१, जवळगाव ४० तर बिलोली तालुक्यातील सगरोळी मंडळात ६०, भोकरमधील किनी मंडळात २९ तर मुखेडमधील जांब मंडळात २६ मिलीमीटर पाऊस झाला. 

राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती जवळा देशमुख येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सोशल डिस्टन्स पाळून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक जी. एस. ढवळे व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशन गच्चे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेतील पुस्तके वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमात अनेकांचा सहभाग
यावेळी बाबुमियाँ शेख, मिलिंद गोडबोले, कुंता शिखरे, मायावती गच्चे, सखुबाई चक्रधर, आशा झिंझाडे, मिना गोडबोले, भिमराव गोडबोले, चांदू गोडबोले, सुनील पंडित, सुलोचना गच्चे, एस. एम. घटकार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कमल गच्चे, हैदर शेख, चौतरा गोडबोले, सुभद्रा ननुरे, इंदीरा पांचाळ, इंदर पंडित, संभाजी गवारे, माया साबणे, भगवान गोडबोले, नूरजहाँ पठाण, सना शेख, पांडूरंग गच्चे, बबन गच्चे, विलास गच्चे, पुरभा गोडबोले यांनी सहभाग घेतला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT