file photo
file photo 
नांदेड

विद्यार्थ्यांनी पालकांशी व स्वत : शी प्रामाणिक राहण्याचा सल्ला- एस. एस. तोटेवाड

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी कठोर परिश्रम केल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांशी व स्वत: शी प्रामाणिक राहण्याचा सल्ला तोटेवाड फिजीकल अकॅडमीचे प्रशिक्षक एस. एस. तोटेवाड यांनी दिला. ते नविन मोंढा येथे सोमवारी (ता. एक) फेब्रुवारी रोजी आयोजीत अकॅडमीच्या देशाच्या विविध फोर्समध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून दै. सकाळचे बातमीदार प्रल्हाद कांबळे आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे पालकांची उपस्थिती होती. 

विद्यार्थ्यांनी आपल्या अंगातील सुप्त गुणांना वाव दिल्यास कुठलेही क्षेत्र आपल्यासाठी सज्ज असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी कसरतीसोबतच अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. तसेच कठोर परिश्रम घेतले तर नक्कीच आपण यश मिळवू शकतो. यासाठी स्वत : प्रामाणिक राहिल्यास आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यात समाधआन तर मिळते. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचा व गुरुजनांचा सन्मान करण्यासाठी कमीपणा वाटू देऊ नये असा सल्ला श्री. तोटेवाड यांनी दिला.

यावेळी प्रल्हाद कांबळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शारिरीक व मानसिकदृष्ट्या मजबूत असायला पाहिजे. देशसेवा करण्यासाठी फोर्समध्ये भरपूर वाव आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. देशसेवा हीच खरी इश्वरसेवा असल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी फोर्समध्ये विविद पदावर निवड झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्य्थांना शुभेच्छा दिल्या.

एसएससी कॉन्स्टेबल जीडी पदासाठी निवड झालेल्या तोटेवाड फिजिकल अकॅडमी नविन मोंढा येथील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये हुंबाड शहाजी उत्तमराव (सीआयएसएफ), वाठोरे अभय भगवान (सीआयएसएफ), राजकुमार शिवाजी तेले (बीएसएफ), कृष्णकुमार कैलास हादरगे (बीएसएफ), अंजीर जयवंत कल्याणकर (आयटीबीपी), शिवाजी भगवानराव संकमवाड (सीआरपीएफ), परमेश्वरी खंडोजी पांचाळ (आसाम रायफल) आणि पूजा गंगाधर भुसलवाड (आसाम रायफल) यांचा समावेश आहे. यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT