file photo 
नांदेड

रक्तदानातून माँ जिजाऊंना करणार अभिवादन; कुसुमताईतील विद्यार्थ्यांचा उपक्रम

प्रल्हाद कांबळे

नांदेड : राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तसेच सुभद्राबाई बिरादार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ता. 12 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता नांदेडच्या ‘सिडको’परिसरातील कुसुमताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

नवीन नांदेडातील कुसुमताई प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि गोदावरी पब्लिक स्कुलच्या वतीने जिजाऊ जयंती आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त ता. 12 जानेवारी रोजी आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, न्यूरो सर्जन डॉ. ऋतुराज जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. सुनील कदम यांचेसह श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव संभाजी बिरादार व सहसचिव शशिकला बिरादार यांची उपस्थिती राहणार आहे.

कुसुमताई विद्यालयात माँ जिजाऊ यांच्या जयंती व मातोश्री सुभद्राबाई माणिकराव बिरादार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 12 जानेवारी रोजी आयोजित रक्तदान शिबिरात नवीन नांदेडातील सिडको तथा हडको परिसरातील सर्व शिक्षक, पालक, नागरिक तसेच तरुण रक्तदात्यांनी विविध गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना जीवनदान देण्याकरिता मोठ्या प्रमाणात रक्तदान करुन आपले सामाजिक कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन या शिबिराचे आयोजक मुख्याध्यापक कमलाकर जोशी, मुख्याध्यापिका उषाताई कारामुंगे, मुख्याध्यापक गोविंद तोरणे यांच्यासह त्यांचे सहकारी शिक्षक अनुक्रमे प्रा. संजय चाटे, प्रा. अंगद केंद्रे, नारायण भालेराव, शेख निजाम, मेरवान जाधव, संजय सूर्यवंशी, किशोर इप्पर, संजय आलेवाड, अरविंद राठोड, प्रा. भागवत हरे, संग्राम चव्हाण, नरसिंग यलमलवाड, मारोती पेंटे, विश्वास हंबर्डे, अर्जुनराव गुंडाळे, विनोद चवरे, दत्ता काकडे, आनंदा हिवराळे, सूर्यकांत वडजे, उज्वला सावते, सुनंदा वाघमारे, सुनिता कोरे, श्यामसुंदरी मुंडे, संगिता मांजरे, सुनंदा कराड, प्रल्हाद लाळे, संतोष भोसीकर, अशोक गायकवाड तसेच रघुनाथ शिंदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

SCROLL FOR NEXT