file photo
file photo 
नांदेड

किनवट मतदार संघातील रस्ते विकासासाठी आमदार केराम यांच्या प्रयत्नाला यश...

साजीद खान

वाई बाजार (जिल्हा नांदेड) : किनवट माहूर मतदारसंघातील रस्ते विकास कामाच्या संदर्भाने जानेवारी महिन्यात आमदार भिमराव केराम यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन किनवट- माहूर तालुक्यातील रस्ते सुधारण्यासाठी निधीची मान्यता व अधिकचा रस्ते कामांना मंजुरी देण्याची आग्रही विनंती केली होती. आमदार केराम यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करुन नितीन गडकरी यांनी किनवट तालुक्यातील चार व माहूर तालुक्यातील एक अशा पद्धतीने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पाच कामे 22 कोटी 82 लक्ष रुपयाचे निधी मंजूर केला आहे. 

माहूर आणि किनवट तालुक्यातील आदिवासी, अति दुर्गम डोंगराळ, बंजारा बहुल खेडे, पाडे, वाडी व तांड्यामध्ये चांगल्या रस्त्यांचा आभाव निर्माण झाला होता. यामुळे अशा खेडेगावात राहणाऱ्या लोकांना आरोग्य व इतर सुविधांसाठी शहरांच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.अशा परिस्थितीत चांगले रस्ते निर्माण करणे अत्यंत गरजेचे असल्याची गाठ मनाशी बांधून किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी राज्यात आपली सत्ता नसतानादेखील रस्ते विकास कामे हाती घेण्याचा दृढनिश्चय केला. दूरगामी परिणामाच्या प्रेरणेने प्रेरित होऊन आ वासून उभ्या टाकलेल्या रस्ते विकासाच्या समस्या घेऊन ता. पाच जानेवारी रोजी केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे माहूर आणि किनवट तालुक्यातील रस्त्याची दयनीय अवस्थेचा पाढा वाचला आणि एक विस्तीर्ण निवेदन देऊन रस्ते विकास कामासाठी निधीची मागणी केली.

आमदार केराम फक्त निवेदन देऊन मागणी करण्यावरच थांबले नाही. तर सदर रस्त्यांच्या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देऊन कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्याची आग्रही मागणी केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून नामदार नितीन गडकरी यांनी माहूर आणि किनवट तालुक्यामधील रस्ते विकास कामासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत किनवट तालुक्यातील इस्लापूर- कोल्हारी- हुडी- इस्लापूर तीन कोटी 96 लक्ष, इस्लापूर- पांगरी- भिसी चार कोटी 59 लक्ष, मांडवी- लिंगी तांडा- लिंगी तीन कोटी 96 लक्ष, कनकी- मिनकी- तलाईगुडा पाच कोटी 71 लक्ष आणि माहूर तालुक्यातील अंजनखेड- नाईकवाडी- सावरखेड चार कोटी 60 लक्ष रुपये इतक्या निधीची तरतूद करून मान्यता दिली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घाणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

SCROLL FOR NEXT