file photo 
नांदेड

Success Story : फुलशेतीतून लाखोंची कमाई; उज्ज्वल भविष्याचा मार्ग

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना या संसर्गाने अनेकांच्या जीवनात बदल घडवून आणला. या काळात अनेकांच्या हातचा रोजगार गेला. परंतु रोजगार गेल्याचे दु: ख मनात न ठेवता जीद्दीने अनेक तरुण शेतीकडे वळले. आपल्या काळ्या आईची सेवा करुन विविध पिकांतून लाखोंचे उत्पादन घेत आहेत. अशाच एका बिलोली तालुक्यातील अटकळी येथील उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने अन्य पिकाला बगल देत एक एकर फुलशेतीतून वर्षाकाठी तब्बल दोन लाखांच्या जवळपास नफा मिळवला आहे.

खरीप हंगामातील पिकांना अनेक औषधांच्या फवारण्या, खुरपणी, वेचणी करण्यासाठी लागणारा खर्च यापेक्षा फुल शेती अधिक फायद्याची असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दयानंद ईरवंत भद्रे यांना परिसरात फुलारी व प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जाते. शेतात दरवर्षी अनेक प्रयोग करुन वेगवेगळे पीक घेतात. कधी टरबूज, मिरची तर कधी हळद यासह आधी पीक घेतले. गेल्या तीन वर्षांपासून ते झेंडूच्या फुलांची शेती करीत आहेत. फुलांच्या उत्पादनातून चांगला फायदा होत आहे. त्यांनी एका एकरात गलांडा आणि बिजली या जातीच्या फुलांची शेती केली. यातून त्यांना वर्षाकाठी तब्बल एक लाख ७० हजार रुपयांचा केवळ नफा झाला.

फुलांची विक्री नांदेड, देगलूर, बोधन, निजामबाद या ठिकाणी

कमी औषधी व खर्चात तेही सिंचन पद्धतीने पाणी देऊन फुल पीक वाढविले गेले. एका एकरात जवळपास १०० क्विंटल फुलांचे उत्पादन झाले. सदर फुलांची विक्री नांदेड, देगलूर, बोधन, निजामबाद या ठिकाणी अधिक होते. बाजारात या फुलांना तीस रुपये ते ऐंशी रुपयांपर्यंत मागणी असते. साधारणतः एका एकरात सर्वच खर्च बघता तब्बल दीड लाखाचे उत्पन्न मिळत असून तेही केवळ साडेतीन महिन्यात.

फुलशेतीला मिळकतीचे साधन बनविले

फुलांची शेती करणे फायद्याचे आहे. हे उच्चशिक्षित शेतकर्‍यांनी दाखवून दिले आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करुन कामाच्या शोधात पुणे गाठले होते. परंतु ते काम अधिक व पगार कमी मिळत असल्याने त्यांनी परत आपले गाव गाठले. आता गावात शेती करण्याचा मानस झाला. अगोदर विविध प्रकारची पिके घेतली. परंतु सर्वाधिक उत्पन्न हे फुलशेतीतून मिळत असल्याने सद्यस्थितीत फुलशेतीला मिळकतीचे साधन बनविले.
- दयानंद ईरवंत भद्रे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Borkhind Samruddhi Highway Interchange : नाशिकला समृद्धी महामार्गाचा थेट फायदा! बोरखिंड इंटरचेंजला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 343 कोटींचा निधी जाहीर

BABAR AZAM: शतक झालं नाही, तरी बाबर आझमने इतिहास रचला! ७६ धावांच्या खेळीने विराट-पाँटिंगच्या खास क्लबमध्ये एन्ट्री, नेमका कोणता विक्रम?

“मी जीवन संपवतोय…” ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याची खळबळजनक पोस्ट; पोलिसांची धावाधाव

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

CM Devendra Fadnavis : एमपीएससी परीक्षेतील गैरप्रकाराबाबत सरकार कठोर; राजकीय पोळी भाजू देणार नाही; सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी

SCROLL FOR NEXT