fail photo
fail photo  
नांदेड

ललित व प्रयोगजीवी कला संकुलाची यशस्वी वाटचाल, कोठे? ते वाचाच

सकाळवृत्तसेवा

नांदेड : नृत्य-नाट्य-संगीत आणि पारंपारिक लोककला वृंध्दीगत करून त्या जतन करण्याच्या हेतूने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने (स्वारातीम) ललित व प्रयोगजीवी कला संकुलाची २०१८च्या शैक्षणिक वर्षात स्थापना केली. त्याद्वारे एम. ए. थिएटर आर्ट्स अँड फिल्म, (नाट्यशास्त्र) एम. ए. संगीत आणि इतर डिप्लोमा व प्रमाणपत्र अभ्यासक्रम इत्यादी कोर्सेस कार्यान्वीत केले.

प्रारंभी ‘साहित्यिक व कलावंत आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत संकुलात विशेष व्याख्यानांचे आयोजन करुन विद्यापीठ प्रशासनाच्या मदतीने शिक्षकांची भरती करून घेतली. विद्यापीठ परिसरातील नाट्य व कलाप्रेमी विद्यार्थ्यांना विविध माध्यमांद्वारे संपर्क करून तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन करून संकुलातील अभ्यासक्रमांचे महत्त्व पटवून देण्यात आले. ज्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली . 

असंख्य विद्यार्थी घडलेत
नाट्य-नृत्य आणि संगीत या कला प्रयोगजीवी व्यावसायिक कला असल्याने विद्यार्थ्यांना नावलौकीकाबरोबरच आर्थिक पाठबळ व प्रसिद्धी मिळते. त्यांच्या कार्यकाळात संकुलातील अनेक विद्यार्थी घडवले गेले. चित्रपट अभिनेता कपिल कांबळे, चित्रपट दिग्दर्शक दिलीप डोंबे, सचिन केरुरकर, बालाजी सुळ, शाहीर संतोष साळुंके, पुरुषोत्तम वाघ, प्रजापती भिसे, अभिलाषा पिंगळे आदी विद्यार्थी नृत्य-नाट्य, चित्रपट, अभिनय आणि संगीत क्षेत्रात यशाचे शिखर गाठतांना दिसत आहेत.

आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवांत सहभाग, नांदेड येथील कुसुम सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा-२०१९ मध्ये संकुलातील विद्यार्थ्यांनी ‘पुष्पांजली’ हे पौराणिक तथा स्त्रीप्रधान नाटक सादर करुन रसिक-प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळवला. ज्यामुळे  संकुल प्रसिद्धीच्या झोतात आले. अर्थातच याचे संपूर्ण श्रेय डॉ. अनमूलवाड यांना जाते. 

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने महाराष्ट्रातील लुप्त होणाऱ्या लोककला, लोकनृत्य आणि लोकवाद्य यांचे संकलन व संगणकीय स्वरुपात जतन करण्यासाठी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या वतीने मोहीम राबविण्यात आली होती. या प्रकल्पाचे मुख्य समन्वयक म्हणून कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी डॉ. अनमुलवाड यांची निवड केली. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड परिक्षेत्रातील सर्व लोककलावंतांचे व त्यांच्या कलांचे चित्रीकरण करण्यात आले. 

त्याचाच एक भाग म्हणून १० फेब्रुवारी २०२० रोजी संकुलाच्या वतीने विभागीय लोककलावंतांचा मेळावा झाला. यात सुमारे ६५० युवा कलावंतांनी भाग घेतला.  सहभागी कलावंतांनी आपल्या पारंपरिक लोककला, लोकवाद्य व लोकनृत्य सादर केले. महाराष्ट्रातील लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे हे या मेळाव्याचे अध्यक्ष होते. हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरावा यासाठी मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले होते.   


विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे
विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलात ऑगस्ट २०१८ ते ०१ जून २०२० पर्यंतच्या जवळपास दोन वर्षांच्या कालावधीत विविध  शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, नवीन कोर्सेस, अद्ययावत अभ्यासक्रम व संकुलाचा भौतिक विकास आणि विद्यार्थांची लक्षणीय प्रगती झाली आणि होत आहे. 
- डॉ. वैजिनाथ अनमुलवाडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT