survey of out-of-school children will conducted in nanded in July Sakal
नांदेड

Nanded News : नांदेड जिल्ह्यात जुलैमध्ये शाळाबाह्य मुलांचे होणार सर्वेक्षण

शिक्षण संचालकांनी दिल्या सूचना; ‘एसओपी’ व माहिती संकलनाचे तयार केले फॉर्मेट

सकाळ वृत्तसेवा

Nanded News : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी येत्या ५ ते २० जुलै,या कालावधीमध्ये सर्वेक्षण राबविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.

यासंबंधी एसओपी व माहिती संकलनाचे फॉर्मेट तयार केले आहे. मागीलवर्षी नांदेड जिल्ह्यात जवळपास अडीच हजारांवर मुले शाळाबाह्य आढळली होती.यापूर्वीदेखील शासनाकडून शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते, त्याच धर्तीवर या सर्वेक्षणाशी संबंधित शासनाच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांची संपर्कात राहून कार्यवाही करण्यात येणार आहे.

यात शाळेत कधीच दाखल न झालेली बालके, शाळेत प्रवेश घेतला, परंतु प्राथमिक श‍िक्षण पूर्ण न केलेली, एक महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने अनुपस्थित राहात असलेली बालके, कुटुंबासोबत स्थलांतरित होऊन येणारी व जाणारी बालके यांचे यात सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे महसूल, ग्रामविकास, नगर विकास, सामाजिक न्याय व विशेष साहाय विभाग, महिला व बालकविकास, कामगार आयुक्तालय, दिव्यांगकल्याण आयुक्तालय, साखर आयुक्तालय, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास विभाग आणि सार्वजन‍िक आरोग्य व गृह विभाग या विभागांच्या सहभागाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेत १८ वर्षे वयोमर्यादेपर्यंतच्या दिव्यांग बालकांचा समावेश करण्यात आला आहे; तसेच लोकप्रतिनिधी, विविध स्वयंसेवी संस्था यांची मदत घेतली जाणार आहे. ही मोहीम ढोल-ताशांच्या गजरात दिंडी स्वरूपात राबविण्याच्या सूचना संचालकांनी दिल्या आहेत.

या भागात होणार सर्वेक्षण

स्थलांतरित बालकांच्या नोंदी घरोघरी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, सिग्नल, हॉटेल्स, खानावळी, सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, वीटभट्ट्या, दगड खाणी, साखर कारखाने, बालमजूर असण्याची शक्यता असेल अशी ठिकाणे; तसेच वंचित गटातील वस्त्यांमधील बालकांना, स्थलांतरित होऊन आलेली कुटुंबे, ज्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे, अशा सर्व ठिकाणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

मागीलवर्षी अडीच हजारांवर आढळली शाळाबाह्य मुले

शिक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येते. मागीलवर्षी अडीच हजारांवर शाळाबाह्य मुले आढळली होती. या बालकांना त्यांच्या वयानुसार वर्गामध्ये दाखल करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात, १४४ वर्षांची आहे परंपरा

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT