file photo 
नांदेड

शिवजयंतीला जाचक अटी घालणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा नांदेडात घंटानाद 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : छत्रपती शिवरायांच्या जयंतीला जाचक अटी टाकणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ नांदेड येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने घंटानाद आंदोलन करुन राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले.

अख्ख्या जगाची अस्मिता असणारे बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त जे काही जाणीवपूर्वक जाचक अटी लावून छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होऊ नये, याकरिता राज्य सरकारने जे पत्रक काढले ते तात्काळ रद्द करण्यात यावे व शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करू द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते डॉ. बालाजी पेनूरकर, प्रदेश संघटक विलास पाटील इंगळे, दक्षिण जिल्हाध्यक्ष तिरुपती पाटील भगनुरे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हानमंत पा. वाडेकर, महानगराध्यक्ष किरण पाटील गव्हाणे, माजी जिल्हाध्यक्ष वि.आ. सदा पाटील पुयड, जिल्हा उपाध्यक्ष माधवराव वडवळे, धर्माबाद ता.अध्यक्ष पंडित पा. जाधव, महेश जाधव, नायगाव ता. अध्यक्ष किरण पाटील जिगळेकर, बिलोली ता. अध्यक्ष दत्ता पा. जाधव, विठ्ठल पा. सिदने, निरंजन पा.कदम, भागवत ढेपे, शिवराज जाधव, अविनाश पा.हिवराळे, गणेश कल्याणकर, शिव पा.पुय्यड, ओमकार जाधव, राजू पा. हिवराळे कोळगावर, संदीप पाटील पुय्यड, सखाराम पा. कदम, शुभम पा. घोरबांड, शिव पुयड, यांची उपस्थिती होती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: ठाकरेंच्या शिलेदारांचा महायुतीशी सामना, मुंबईत दुरंगी सामने अटीतटीचे ठरणार; कोण-कुठे लढणार?

Ruturaj Gaikwad: 'ऋतुराजला संधी तेव्हाच मिळेल, जेव्हा विराट आणि रोहित वनडेत...', R Ashwin नेमकं काय म्हणाला?

Election: निवडणूक की सत्तेचा सौदा? मतदारांचा विश्वास तुटतोय, मतदान टक्केवारी कमी होणार? मनपा निवडणुकांपूर्वीच प्रश्नचिन्ह

Angarki Sankashti Chaturthi 2026: अंगारकी चतुर्थीला करा 'हे' उपाय, भगवान गणेशाच्या आशीर्वादाने संपत्तीत होईल वाढ

Attack on US Vice President Residence : मोठी बातमी! अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स यांच्या वॉशिंग्टनमधील घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT