नांदेड : जुन्या वादातून एकाला रस्त्यात अडवून मित्राला का मारलास म्हणून तलवारीने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना संभाजी चौक सिडको येथे मंगळवारी (ता. नऊ) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. जखमीवर विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सिडको परिसरातील क्रांती चौक येथील सुनिल भगवानराव सूर्यवंशी (वय ३०) याचा आणि याच भागातील माधव गायकवाड यांचा काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. यावेळी माधव गायकवाडला सुनिल सूर्यवंशी याने मारहाण केली होती. हा राग मनात धरून गायकवाडच्या मित्रांनी संगनमत करून सुनिल याला अद्दल घडवायचे ठरवले. यावरून त्यांनी संभाजी चौक परिसरात थांबले असताना त्या दरम्यान आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी सुनिल सूर्यवंशी हा लातूर फाट्याकडे जात होता.
तलवार हल्ल्यात सुनिल सूर्यवंशी गंभीर जखमी
त्याला संभाजी चौकात अडवून शिवीगाळ केली. धक्काबुक्की करून चक्क तलवारीने माधव गायकवाडसह त्याच्या मित्रांनी मारहाण केली. सुनील सूर्यंवंशी याच्या दोन्ही पायावर, दोन्ही हातावर, चेहऱ्यावर जबर दुखापत करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी करून सर्व मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. मारहाणीची घटना सुनिल याच्या घरी समजताच त्याच्या नातेवाईकांनी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनिलला घेऊन विष्णुपूरीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
सात जणांवर विविध कलमान्वये गुन्हा
शुद्धीवर आल्यानंतर सुनिल सूर्यवंशी याने नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारेकरी बाळासाहेब उर्फ बाली कांबळे रा. नावघाट, रहेमान शेख रा. हिम्मतपूर, माधव गायकवाड रा. दिशानगर, रहीम रा. रहीमपूर आणि इतर तीन अशा सात जणांवर प्राणघातक हल्ला, दंगल आणि भारतीय हत्यार प्रतिबंध कायद्याप्रमाणे बुधवारी (ता. १०) पहाटे सव्वादोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांनी भेट दिली. तपास पोलिस निरीक्षक असद शेख करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.