file photo 
नांदेड

सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या अडचणींच्या निवारणांसाठी पेन्शन अदालत घ्या- जिल्हाधिकाी डाॅ. विपीन 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या अडचणींचे निवारण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभाग व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत पेन्शन अदालतीचे आयोजन करावे. तसेच याबाबत सर्व विभाग / कार्यालय प्रमुखांनी परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.    

सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या अडचणींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक विभागीय आयुक्त व इतर विभागाचे विभाग प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 1. 30 वाजेपर्यंत पेन्शन अदालतचे आयोजन / प्रयोजन करावे. तसेच स्थानिक वृत्तपत्रात पेन्शन अदालत म्हणून या कार्यक्रमास प्रसिद्धी देण्यात यावी, असे शासन परिपत्रकान्वये आदेश निर्गमित केले आहेत.  

सेवानिवृत्त वेतनविषयक प्रलंबित प्रकरणे व पेन्शन अदालत मधील पेन्शन तक्रारी / निवेदन हातळण्यासाठी कार्यालयातील एक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करावी. त्यांचे नाव, पदनाम, भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल देण्यात यावे. जेणेकरुन त्या-त्या विभागातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी आपल्या सेवानिवृत्ती वेतन विषयक प्रलंबित प्रकरणांच्या तक्रारींचा / निवेदनांचा तपशील पेन्शन अदालतमध्ये मांडू शकतील. नोडल अधिकारी नियुक्त आदेशाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयास दयावी. सर्व विभाग / कार्यालय प्रमुखांनी याप्रमाणे आयोजन / प्रयोजन करुन सेवानिवृत्त वेतनविषयक प्रलंबित प्रकरणांचा व प्रत्येक अदालतमध्ये महिनाअखेर आलेल्या तक्रारी / निवेदन व त्या निवारण्याकरीता करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेस निश्चितपणे पोहोचेल अशारितीने जिल्हाधिकारी कार्यालयातील समन्वय अधिकारी तहसिलदार (सर्वसाधारण) यांचेकडे पाठवावेत. सर्व विभाग / कार्यालय प्रमुख यांनी परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT