तलाठी लाचेच्या जाळ्यात 
नांदेड

श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टकडून लाच घेणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

या तक्रारीनुसार २५ मे रोजी पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये तलाठी विजयकुमार कुलकर्णी यांनी तक्रारदार यांच्याकडे कामासाठी पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

प्रमोद चौधरी

नांदेड ः मौजे गागलेगाव (ता. बिलोली) येथील तलाठी विजयकुमार गोपाळराव कुलकर्णी (वय ४८) याला चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता. २७) रंगेहाथ पकडला. त्याच्याविरुद्ध बिलोली पोलिस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट गागलेगाव यांनी जमीनीच्या नोंदणीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी तलाठी विजयकुमार कुलकर्णी यांनी १८ मे २०२१ रोजी १५ हजार रुपयांची मागणी करुन १० हजार रुपये घेतले. उर्वरीत पाच हजार रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे देण्यात आली.

हेही वाचा - गुरुवारी (ता. २७) अखेर नांदेडच्या जिल्हाधिका-यांना वाळू घाटाचा खडतर प्रवास करुन कारवाई करावी लागली. चारचाकी वाहन जाईल तिथपर्यंत, त्यानंतर दुचाकी आणि पुन्हा पायी प्रवास करत जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी वाळू घाट गाठले.

या तक्रारीनुसार २५ मे रोजी पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये तलाठी विजयकुमार कुलकर्णी यांनी तक्रारदार यांच्याकडे कामासाठी पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याचे ठरल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन गुरुवारी बिलोली तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तलाठी विजयकुमार कुलकर्णी हे चार हजार रुपये घेण्यासाठी तेथे आले. ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपअधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश पुरी, सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष शेट्टे, एकनाथ गंगातीर्थ, गणेश केजकर, नरेंद्र बोडकरे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT