File photo 
नांदेड

विनाअनुदानित शाळांचे शिक्षक हवालदिल, कशामुळे? ते वाचलेच पाहिजे

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सध्या सगळीकडे लाॅकडाउन सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक क्षेत्रांसाठी सरकारने विशेष पॅकेज जाहीर केले. मात्र, विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षकांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. अत्यल्प कमी वेतन व शिक्षकांना मिळते. त्यामुळे अनेक शिक्षक शेतमजुरी, दुकानावर कामगार आणि छोटा-मोठा व्यवसाय करून आपले घर चालवित आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये अंशतः अनुदानित, विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात काम करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या संख्येत आहे. आज ना उद्या आपल्याला वेतन चालू होईल, या आशेवर ते जीवन जगत आहेत. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे ते दुर्दैवी ठरत आहे. त्यातच कोरोनाच्या संकटाने त्यांच्या अडचणिही वाढल्या आहेत. अनेक शाळा अनुदानास पात्र झाल्या आहेत. २० टक्क्यांवरून ४० टक्के निधी करण्याचा शासनाने जीआरसुद्ध काढला. प्रत्यक्षात शिक्षकांच्या पदरी काहीच मिळाले नाही. त्यामुळे शिक्षकांचे मनोबल दिवसेंदिवस खचत आहे.

कित्येक वर्षांपासून लढा
विनाअनुदानित शाळांतील शिक्षक अनुदानासाठी कित्येक वर्षांपासून सघर्ष करत आहे. मात्र, या शिक्षकांना आजवर केवळ आश्वासन मिळाले. मधल्या काळात या शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यानंतर काही शाळांना अनुदान मिळाले तर काहींना मिळाले नसल्याने अशा विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. 

इंग्रजी शाळांतील शिक्षकांचे थकले वेतन
मार्च महिन्यात ऐन परीक्षेच्या काळात शाळा बंद झाल्यामुळे इंग्रजी शाळांचे लाखो रुपये फीच्या रुपात पालकांकडे थकले. इंग्रजी शाळांचे जवळपास ३० ते ४० टक्के फीस ही पालकांकडे थकीत आहे. त्यामुळे शिक्षकांचेही वेतन थकले आहे. ग्रामीण भागात पालक नेहमीच शेवटच्या परीक्षेपर्यंत फी भरण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा शासनाने पहिल्या लाॅकडाउनची घोषणा केली. त्यावेळी लाॅकडाउन २१ दिवसाचे होते. त्यानंतर ते वाढविण्यात आले. 

आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते
इंग्रजी शाळांची परिस्थिती सद्यस्थितीत बिकट झालेली असून, शाळा बंद असल्याने इंग्रजी शाळांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शाळांकडे शिल्लक असलेला पैसा फेब्रुवारी-मार्च महिन्यांच्या पगारीसाठी खर्च करण्यात आला. आता शाळांतील शिक्षक, वाहनचालक, शिपाई यांचे पगार करायला पैसाच नाही.
- साहेबराव हिवराळे (संस्थाचालक)   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT