file photo 
नांदेड

सांगा, आम्ही आत्मनिर्भर व्हायचे कसे?

शिवचरण वावळे

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणाईला आत्मनिर्भर होण्याची साद घातली आहे. आत्मनिर्भर हा शब्द नवीन वाटत असला तरी, विविध योजनेच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी युवकांना शेतीला जोडधंडा, लघु व कुटीर उद्योगाचे व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते.

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत विशेष घटक योजनेंतर्गत १५ दिवसांपासून ते एक महिण्याचे ब्युटीबार्लर, शिवणकला, टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करणे, पादत्राणे बनवणे, गोल्ड ज्वेलरी, दुग्ध जन्यपदार्थ व प्रक्रिया उद्योग यासह फोटोग्राफी, मोटार दुरुस्ती, गवंडी काम, सुतारकाम, बंदीस्त शेळीपालन, गोठा व्यवस्थापन, रिसेप्शनिष्ट ट्रेनिंग असे विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण घेण्यासाठी दहावी नापास विद्यार्थी - विद्यार्थीनी यांना सहज प्रशिक्षण घेता येते. प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४० टक्के विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय सुरु करतात. इतकेच नव्हे तर इतरांना रोजगारसुद्धा देतात.

हेही वाचा - नांदेडकरांना सोमवारने दिला धक्का, पुन्हा तीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर

यासाठी शासन विशेष घटकातील युवक युवतींना प्रशिक्षणाकरिता १५ लाख, आदिवासी घटकांसाठी सहा लाख आणि सर्वसाधारण घटकांसाठी २५ लाख रुपये असे एकत्रित ४६ लाख रुपयांचे बजेट दरवर्षी देते. दिलेल्या बजेटप्रमाणे सर्वसाधारण घटकांतील साडेचारशे, आदिवाशी घटकातील २१० तर विशेष घटकातील साडेचारशे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. परंतु, या योजनेसाठी शासनाकडे बजेट नसल्यामुळे योजना तात्पूरती का होईना बासनात गुंडाळुन ठेवली आहे. पुढे ही योजना कधी सुरु होईल निश्चित सांगता येणे कठीण आहे.

एकीकडे आत्मनिर्भर होण्याचा सल्ला देत असलेले शासन स्वंयरोजगार प्रशिक्षणाची दारे बंद करत असल्याने ग्रामीण भागातील महिला, मुली, युवक आत्मनिर्भर होणार कसा? हा मोठा प्रश्न आहे.

हे देखील वाचलेच पाहिजे - शीतपेय विक्रेत्यांचा व्यवसाय थंडावला, काय आहे कारण? वाचाच

या योजनेच्या जोरावरच ग्रामीण भागातील तरुणाईला दूग्ध व्यवसाय, कुकुटपालन, मोटार मेकॅनिक होण्याची संधी होती, तर महिलांना देखील ब्युटी पार्लर, टेलरिंग, लोणचे, पापड उद्योगातून आत्मनिर्भर होण्याची मोठी संधी होती. परंतु, योजनेला बजेट नसल्याने अनेकांना आत्मनिर्भर होत येणार नाही इतके नक्की.
 

प्रशिक्षणासाठी लवकरच बजेट मिळेल
शासनाची ही योजना तात्पूरती बंद करण्यात आली आहे. कायमची बंद झालेली नाही. त्यामुळे पुन्हा ही योजना सुरु झाल्यास मुळ बजेटमध्ये कमी अधिक बजेट मिळण्याची शक्यता आहे. शासनाकडून स्वंयरोजगार प्रशिक्षणासाठी कार्यक्रमासाठी लवकरच बजेट मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- राजेंद्रसिंह परिहार, वरिष्ठ उद्योग निरिक्षक.

 

Attachments

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT