मोकळ्या हवेत फिरण्यासह व्यायामाकडे कल  sakal
नांदेड

नांदेड : मोकळ्या हवेत फिरण्यासह व्यायामाकडे कल

नागरिकांची सर्वाधिक पसंती; कोरोनाचा जीमचालकांना फटका

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना संसर्गामुळे जगभरात लॉकडाउन झाले होते. त्यामुळे अनेक उद्योग, व्यवसायांवर त्याचा परिणाम झाला. अनेकांचे रोजगार हिरावले गेले. सध्या परिस्थिती थोडीफार सामान्य झाली असली तरी सामान्य नागरिकांना त्यांच्या कामाचा मोबदला अजूनही म्हणावा तसा मिळत नाही. एकंदरीत अनेकांचे उत्पन्नाचे स्त्रोत ठप्प असल्याने पूर्वी जीममध्ये जाऊन घाम गाळणारे आज मोकळ्या हवेत व्यायाम करण्यास सर्वाधिक पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जीम चालकांनाही त्याचा फटका बसला आहे.

सातवा वेतन लागू झाल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ झाली आहे. एकाच घरातील दोघा पती पत्नीला ५० हजारापासून ते एक लाख रुपयापर्यंत पगार मिळतो. गरजेपेक्षा जास्त पगार खात्यात जमा होत असल्याने अनेकांनी शेती, प्लॉट, चार चाकी वाहन खरेदी करुन पैशांची गुंतवणूक केली होती. त्यामुळे अनेकांवर बँकेच्या हप्त्यांचा बोजा वाढलेला असताना देखील उच्च दर्जाची लाईफस्टाईल जगण्याच्या नावाखाली महागडे स्पोर्ट शूज, ट्रॅक सुट, स्पेशल जीम ट्रेनरची नियुक्ती, प्रोटीनयुक्त पावडर अशा देखाव्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जात होते. नेमकी हीच बाब शहरातील काही व्यवसायिकांनी हेरली आणी कोट्यावधी रुपये खर्च करत महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व अत्याधुनिक जीमची अनेक ठिकाणी उभारणी केली आहे. त्यासाठी ट्रेनिंग देण्यासाठी मोठ्या शहरातील प्रशिक्षकांची देखील नेमणूक केली आहे.

मात्र, कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाउन नंतर आज देखील अनेक जणांच्या हातात म्हणावा तसा पगार पडत नाही. त्यामुळे अनेकांना इच्छा असताना देखील दैनंदिन जीवन जगण्यावर स्वतःच निर्बंध घालावे लागत आहेत. जीममध्ये जाऊन आरोग्याच्या दृष्टीने शरिरयष्टी जपण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जात होते. मात्र, त्यास मुरड घालावी लागत आहे. आज थंडीची लाट पसरत असली तरी नागरिक जीममध्ये जाण्याचे टाळून थेट शहरातील रस्त्यावरील मोकळ्या हवेत व्यायाम करण्यास सर्वाधिक पसंती देत असल्याचे दिसून येते. नागरिकांनी अचानक त्यांचा मूड बदलल्याने शहरातील जीम व्यावसायिक देखील चिंतेत सापडले आहेत.

"पूर्वी जीममध्ये जाऊन व्यायाम करत होतो. परंतु कोरोना दरम्यान जीममध्ये जाऊन व्यायाम करण्यास प्रतिबंध करण्यात आले होते. तेव्हापासून जुन्या मित्रांसोबत मोकळ्या हवेत जाऊन व्यायाम करण्याची सवय जडली आहे. त्या निमित्ताने रोज नव्या मित्रांच्या यादीत भर पडते. रोज नव्या विषयावर मनसोक्त चर्चा होते. हे जीमपेक्षा अधिक बरे वाटत आहे."

- रामदास जगताप, नागरिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग चौथ्या दिवशी सोनं स्वस्त! वाढत्या तेलदरांचा परिणाम; जाणून घ्या आजचे ताजे भाव

Mumbai Mayor Cup Carrom Tournament: कॅरम बोर्डवर प्रशांत मोरेचा दबदबा! महापौर चषकात एकतर्फी विजयाने सर्वांचे लक्ष वेधले

Solapur Accident: कार अन्‌ टिप्परच्या धडकेत ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू; अहिल्यानगर-टेंभुर्णी महामार्गावर जातेगाव येथे भीषण अपघात, तिघेजण जखमी..

मुंबई-बंगळूर 'वंदे भारत स्लीपर' पुणेमार्गेच, दर राजधानीपेक्षा जास्त; २०० किमी प्रवास केला तरी ४०० किमीचं भाडं द्यावंच लागणार

Nashik: लग्नानंतर सासरचं नाव लावण्यावरून वाद, जबरदस्तीने गर्भपात अन् ३ कोटींची मागणी; महिला लोकप्रतिनिधीच्या डॉक्टर पतीला अटक

SCROLL FOR NEXT