असर्जन भागात खून 
नांदेड

जुन्या वादातून नांदेड शहराच्या असर्जन भागात एकाचा निर्घृण खून

विष्णुपूरी येथील राहणारा हरमीतसिंग रेखासिंग पुजारी (वय २०) याचे आणि असर्जन येथील एका युवकासोबत काही दिवसापूर्वी कुठल्यातरी कारणाने वाद झाला होता.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहराच्या विष्णुपूरी (ता. नांदेड) (Nanded vishnupuri) भागात राहणाऱ्या हरमितसिंगग पुजारी (Harmitshing pujari) या वीस वर्षीय युवकाचा जुन्या वादातून (old dispuse murder) त्याच्या मित्रांनी दोरीने गळा आवळून निर्घृण खून केला. ही घटना सोमवारी (ता. १०) पहाटे दोनच्या सुमारास असर्जन परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात असर्जनच्या चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. The brutal murder of one in the Asarjan area of Nanded city over an old dispute

याबाबत अधिक माहिती अशी की विष्णुपूरी येथील राहणारा हरमीतसिंग रेखासिंग पुजारी (वय २०) याचे आणि असर्जन येथील एका युवकासोबत काही दिवसापूर्वी कुठल्यातरी कारणाने वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरुन त्याने हरमीतसिंग पुजारी याला रविवारी (ता. नऊ) मेच्या रात्री साडेनऊच्या सुमारास विष्णुपूरी परिसरातील एका रस्त्यावर गाठले. त्याच्याशी वाद घालून आपल्या मित्रांना बोलावून घेऊन त्यांच्या मदतीने हरमितसिंग याला असर्जन परिसरात असलेल्या एमपी थेटर कंपाऊंडमध्ये नेले. तेथे त्याला बेदम मारहाण करुन दोरीने गळा आवळून निर्घृण खून केला. हा प्रकार सोमवारी ( ता. दहा ) मेच्या पहाटे दोनच्या सुमारास उघडकीस आला.

हेही वाचा - लाखोचा माल करायचे खरेदी; बदल्यात रकमेचा द्यायची चेक, पण त्यांची चालाखी उघड

घटनेची माहिती नियंत्रण कक्षास मिळाल्यानंतर तेथून ग्रामिण पोलिस ठाण्यात संदेश गेला. यानंतर ग्रामिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वजीत कासले, फौजदार शेख असद यांनी आपल्या वरिष्ठांना माहिती देऊन घटनास्थळ गाठले. तोपर्यंत पोलिस उपाधीक्षक (इतवारा उपविभाग) सिद्धेश्वर भोरे यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली. हरमितसिंग पुजारी याच्या मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी शासकिय रुग्णालय विष्णुपूरी येथे मृतदेह दाखल केला.

याप्रकरणी रेखासिंग पुजारी यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात असर्जन येथील राहणाऱ्या चार जणांविरुद्ध संगनमताने खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वजीत कासले करत आहेत. चारही आरोपी सध्या फरार असून त्यांना लवकरच अटक करु असा विश्वास पोलिस निरीक्षक श्री. घोरबांड आणि एपीआय विश्वजीत कासले यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT