nanded sakal
नांदेड

Maratha Reservation : ‘सकल’ मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव ; ढोल ताशांच्या गजरात जल्लोष

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी शासनासमोर ठेवलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये शनिवारी (ता. २७) आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी शासनासमोर ठेवलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये शनिवारी (ता. २७) आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तसेच इतर विविध ठिकाणी सकल मराठा समाजातर्फे ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करत पेढे, मिठाई आणि गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजीही करण्यात आली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी कुच केली होती. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यातून मराठा बांधव मोठ्या संख्यंने सहभागी होत होते. शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर मुंबईत आंदोलन करण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम होते. शासनाच्या शिष्टमंडळाने त्यांनी आंदोलन करू नये, यासाठी विनंती केली होती.

त्यानंतर ते मुंबईच्या वेशीवर असलेल्या वाशी येथे पोहचल्यानंतर शासनाने विविध अध्यादेश काढत त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे शुक्रवारी (ता. २६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनी स्पष्ट केले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या संदर्भाचे पत्र दिल्यानंतर जल्लोष सुरू झाला.

नांदेडमध्ये सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने ठिकठिकाणी मिठाई वाटून फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या या आनंदोत्सवात विविध पक्षांचे राजकीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. , ता. २७ ः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी शासनासमोर ठेवलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये शनिवारी (ता. २७) आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तसेच इतर विविध ठिकाणी सकल मराठा समाजातर्फे ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करत पेढे, मिठाई आणि गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजीही करण्यात आली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी कुच केली होती. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यातून मराठा बांधव मोठ्या संख्यंने सहभागी होत होते. शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर मुंबईत आंदोलन करण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम होते. शासनाच्या शिष्टमंडळाने त्यांनी आंदोलन करू नये, यासाठी विनंती केली होती. त्यानंतर ते मुंबईच्या वेशीवर असलेल्या वाशी येथे पोहचल्यानंतर शासनाने विविध अध्यादेश काढत त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे शुक्रवारी (ता. २६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनी स्पष्ट केले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या संदर्भाचे पत्र दिल्यानंतर जल्लोष सुरू झाला.

नांदेडमध्ये सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने ठिकठिकाणी मिठाई वाटून फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या या आनंदोत्सवात विविध पक्षांचे राजकीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT