नांदेड

वडगाव शिवारात रानगवा आढळल्याने खळबळ

सकाऴ वृत्तसेवा

ज्वारीच्या शेतात वनरक्षक उद्धव वर्तळे हे रानगवा बघण्यासाठी घुसले. अज्ञाताच्या येण्याची चाहूल लागताच रानगवा उभा राहिलेला बघून वर्तळे घाबरून बाहेर पडले.

तामसा (नांदेड) : तामसा वनपरिमंडळ अंतर्गत असलेल्या वडगाव शिवारात (Wadgaon Shivara) शुक्रवारी (ता. सात) रानगवा (Rangava) आढळल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ होती. वडगाव शिवारातील शेतकरी राजेंद्र गौर यांच्या शेतातील उन्हाळी ज्वारीमध्ये रानगवा असल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास वनविभागाला कळविली. त्यामुळे रानगवा असण्याची खात्री पटविण्यासाठी तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी शरयू रूद्रावार, तामसा वनपरिमंडळ अधिकारी मनोज गुरसाळी, वनपाल श्रीनिवास सालमेट्टी, नांदेडचे मानद वन्यजीव रक्षक अतिंद्र कट्टी हे घटनास्थळी डेरे दाखल झाले. (The discovery of Rangava in Wadgaon Shivara has created a stir)

ज्वारीच्या शेतात वनरक्षक उद्धव वर्तळे हे रानगवा बघण्यासाठी घुसले. अज्ञाताच्या येण्याची चाहूल लागताच रानगवा उभा राहिलेला बघून वर्तळे घाबरून बाहेर पडले. या दरम्यान त्यांचा मोबाईल पडला. शेताच्या चारी बाजूनी वनकर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात येऊन रानगव्यावर पाळत ठेवणे चालू झाले. रात्री आठच्या दरम्यान रानगवा शेताच्या बाहेर पडून कंजारा-कोळगाव दिशेने पसार झाला. अंदाजे बारा तास रानगवा वडगाव शिवारात होता. यादरम्यान त्याला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वनविभागाकडून झाली. शनिवारी सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हिमायतनगर वनक्षेत्र परिसरापर्यंत रानगव्याची माहिती घेतली.

हदगाव वनक्षेत्रात तो नसण्याची खात्री झाली. तालुका वनक्षेत्रामध्ये पहिल्यांदाच रानगवा आढळल्याची नोंद या घटनेनंतर झाली आहे. बहुदा भरकटत तो या भागापर्यंत आला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हदगाव तालुक्यातील जंगलबहुल भागात किंवा शेतशिवारात रानगवा आढळल्यास घाबरून न जाता वनविभागाला ताबडतोब संपर्क करण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी शरयू रुद्रवार यांनी केले आहे. या मोहिमेदरम्यान वनरक्षक वामन शेळके, गंगाधर शिंदे, राम फटिंग आदींसह वनरक्षक व वनसेवक कर्तव्यावर होते.

" रानगवा परिसरातील अंदाजे दोनशे किमी अभयारण्य परिसरात अस्तित्वात असल्याची नोंद नाही. मेळघाट व ताडोबा अभयारण्य परिसरात रानगव्याचे अस्तित्व आहे. पैनगंगा व टिपेश्वर अभयारण्यात तो दिसल्याची नोंद नाही. त्यामुळे तामसा भागात रानगवा आढळणे, हा संशोधनाचा विषय आहे.

- अतींद्र कट्टी, मानद वन्यजीव रक्षक, नांदेड.

(The discovery of Rangava in Wadgaon Shivara has created a stir)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Baramati lok sabha: मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

SCROLL FOR NEXT