nanded Sakal
नांदेड

Nanded : कुरुळा मंडळातील खरिपाची पैसेवारी ४८ पैसे ; दुष्काळी चित्र झाले स्पष्ट

कुरुळा मंडळाची अंतिम आणेवारी ४८ पैसे असून दुष्काळी चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दयनीय अवस्थेत असलेल्या बळीराजाला आर्थिक आधाराची गरज आहे.

सकाळ वृत्तसेवा

कुरुळा : नुकतेच खरीप हंगामाची पैसेवारी जाहिर झाली. त्यानुसार शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न किती? शेतकऱ्यांचे अर्थकारण किती कोलमडले, शेतीचा खर्च वजा उत्पन्न आदी बाबींची जाणीव प्रकर्षाने झाली. पैसेवारी ५० च्या आत असेल तर दुष्काळी परिस्थिती गृहीत धरून आर्थिक मदत व्हावी अशी शेतकऱ्यांची धारणा असते. कुरुळा मंडळाची अंतिम आणेवारी ४८ पैसे असून दुष्काळी चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दयनीय अवस्थेत असलेल्या बळीराजाला आर्थिक आधाराची गरज आहे.

कुरुळा महसूल मंडळात सोयाबीन आणि कापूस पिकाची लागवड सर्वाधिक असून मुख्य पीकाचा दर्जा आहे. या उत्पन्नातूनच वर्षभराची प्रपंचासाठी आर्थिक तजवीज करावी लागते. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाचे म्हणावे तसे उत्पन्न हाती नाही आले. यंदा जून ओलांडून उशिराने झालेल्या पेरण्या आणि त्यात अत्यल्प पाऊस यामुळे उगवण बरोबर झाली नाही परिणामतः सरासरी उत्पन्न पन्नास टक्क्यापेक्षाही कमी झाले. सोयाबीन उत्पन्नातून तर एकरी खर्चही निघाला नसल्यामुळे अपेक्षाभंग झाला आहे. त्यात सरकारी सुलतानी संकटाची भर म्हणून जेमतेम झालेल्या सोयाबीन व कापसाला चांगला बाजार भावही नाही त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.

विमा लवकर जमा होईना

खरीप हंगामात झालेल्या नुकसानिपोटी २५ टक्के अग्रीम विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असून ही प्रक्रिया अतिशय संथ गतीने होत असल्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण होत आहे. वास्तविक पाहता विमा रक्कम दिवाळी सणाच्या दरम्यान मिळणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना तुटपुंज्या विमा रकमेची वाट पाहावी लागत आहे. प्रशासकीय यंत्रणेकडे विचारणा केली असता अनभिज्ञता दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT