शेतकरी शिबदरा येथील
शेतकरी शिबदरा येथील 
नांदेड

चांगली बातमी : सुशिक्षित शेतकऱ्याने फळबागेच्या माध्यमातून साधला आर्थिक विकास

प्रभाकर दहिभाते

बरडशेवाळा ( जिल्हा नांदेड ) : गेल्या चार ते पाच वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा रब्बी व खरीप हंगाम दरवर्षी पूर्णत: वाया जात आहे. निसर्गाच्या बदलत्या वातावरणाप्रमाणे शेतकऱ्यांनीही (Farmer gave good product) आता आपली पीक घेण्याची पद्धत बदलायला पाहिजे. तरच शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न घेता येईल. व शेतकरी सुदृढ बनेल याचे ताजे उदाहरण तालुक्यातील (hadgaon taluka shibdara) येथील तरुण व उच्चशिक्षित शेतकरी जगन्नाथ बबनराव दुर्गे यांचा. दुर्वे नोकरी करीत आपल्या शेतीत पेरु या पिकाची लावगड करुन भरघोस उत्पन्न मिळवले व शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला. (The good news: Educated farmers have achieved economic growth through orchards)

‌‌

आजच्या आधुनिक युगात पारंपारिक शेतीला फाटा देत बामणी फाटा परिसरातील शिबदरा येथील सुशिक्षित व तरुण अल्पभूधारक शेतकरी जगन्नाथ दुर्गे यांनी केवळ अडीच एकर शेतीमध्ये दोनशे पेरुच्या झाडांची व सीताफळांची लावगड दोन वर्षांपूर्वी केली व त्यांनी यासाठी त्यांना आजवर पन्नास हजार रुपये खर्च केला.

हेही वाचा - जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न भंगले, कोरोनाने साधला डाव

आठ ते दहा महिन्यापासून त्यांनी पेरु या फळाचे उत्पन्न अंदाजे आठ महिन्यात 80 हजार रुपये मिळवले आहे. त्यानंतर त्यांना कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळणार आहे. अजूनही त्यांना सिताफळ या पिकाची उत्पन्न मिळणे बाकी आहे. पुढील काळात त्यांना एक एकर शेतीत पेरु व सीताफळ या दोन्ही फळपिकांच्या माध्यमातून वर्षाकाठी किमान दीड लाख रुपये निव्वळ नफा मिळणार असल्याचे मत दुर्गे यांनी व्यक्त केले आहे.

फळपिकांच्या शेतीसाठी तालुका कृषी अधिकारी श्री. रणवीर व मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका तंज्ञ व्यवस्थापक सतीश खानसुळे, साहाय्यक गजानन संगेवार, विजय धनकवार याची वेळोवेळी मार्गदर्शन घेतले ते फायदेशीर ठरले असल्याचे जगन्नाथ दुर्गे यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT