The livelihood of many people depends on godambi nutrient nuts Sakal
नांदेड

Nanded News : बहुगुणी बिब्ब्याच्या गोडंबीवर चालतो अनेकांचा संसारगाडा

कंधार तालुक्यातील भोई समाजातील महिलांचा बिब्बा फोडण्याचा जीवघेणा प्रवास

धोंडिबा बोरगावे

फुलवळ : कंधारच्या मन्याड खोऱ्यात बहुगुणी फूल बिब्ब्याची तोडणी करून त्यातील गोडंबी फोडून बाजूला काढून त्याची बाजारात विक्री करून त्यावर पोटाची खळगी भरण्यासाठी आजही भोई समाजातील महिलांना जीवघेणा बिब्बा फोडण्याचा उद्योग करावा लागतोय. याच बहुगुणी बिब्ब्याच्या गोडंबी विक्रीतून अनेकांचा संसारगाडाही चालत आहे.

बिब्बा फोडणाऱ्या या महिला कंधार तालुक्यातील फुलवळसह घोडज, बाचोटी, नवरंगपुरा, धर्मापुरी, पांगरा, बामणी, मंगलसांगवी या गावांत अनेक वर्षांपासून बिब्बे फोडण्याचे काम करत आहेत.

त्यांचा हा व्यवसाय घरगुती असला, तरी त्यातूनच या महिलांना रोजगार मिळतो. पण, बिब्ब्यातून निघणाऱ्या हानिकारक तेलामुळे शरीरावर असंख्य जखमा होतात. महिलांचे चेहरे विद्रुप होतात. महिलांसाठी हे त्रासदायक असून तरुण मुलींच्या चेहऱ्यावर होणारे परिणाम त्यांच्या भविष्यावरही हानिकारक होत असतात.

बिब्यापासून तयार होणारी गोडंबी हे विशेषत: हिवाळ्यात सुका मेवा म्हणून वापरली जाते. गोडंबी वेगळी करण्याचे काम अत्यंत जिकरीचं असतं. बिब्बा फोडत असताना त्यातून अंगावर उडणाऱ्या हानिकारक तेलामुळे अनेक महिलांना जखमा होतात.

आज शेतीच्या तंत्रज्ञानाचा वापर होतो, दुसरीकडे या महिलांना बिब्बे फोडण्याचं काम करून उदरनिर्वाह करावा लागतोय. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये या गोडंबीला मोठी मागणी आहे. हे बिब्बे फोडल्यानंतर मिळणाऱ्या गोडंबीची ८०० ते १००० रुपये किलो दराने गावोगावी फिरून विक्री केली जाते.

मात्र, बिब्बे फोडणाऱ्या या महिलांच्या हातात सरासरी दीडशे ते दोनशे रुपये मजुरी येते. गोडंबीला वेगळं केल्यानंतर उरलेल्या टरफलातून तेल काढलं जातं. हे तेल मानवी त्वचेसाठी हानिकारक असलं, तरी ऑइलपेंट निर्मितीसाठी वापरलं जातं.

सुका मेव्यामधील महत्त्वाचा घटक असलेली गोडंबी बिब्ब्यापासून तयार होते. विशेषत: हिवाळ्यात ही गोडंबी शक्तिवर्धक मेवा म्हणून वापरली जाते. बिब्ब्यापासून गोडंबी वेगळी करण्याचे काम अत्यंत जिकरीचं असून हे काम करणाऱ्या महिलांना कायमस्वरूपी चेहरा विद्रूप आयुष्य जगावं लागतं.

बिब्बा फोडत असताना त्यातून उडणाऱ्या तेलामुळे या महिलांच्या शरीरावर अनेक जखमा होऊन सौंदर्याला मोठी बाधा निर्माण होते. या बिब्बा फोडण्यासाठी अजूनतरी ग्रामीण भागात एकही यांत्रिक साधन उपलब्ध नसल्यानं पारंपरिक पद्धतीनेच महिलांना हे काम करावं लागतं. मोठे व्यापारी बिब्ब्यांची खरेदी करून भोई समाजातील महिलांना बिब्बा फोडण्यासाठी देतात. त्यातून महिलांना अत्यल्प मजुरी मिळते.

त्यावर त्यांचा दैनंदिन उदरनिर्वाह चालतो. या महिलांच्या आरोग्यासाठी आजपर्यंत कुणीही प्रयत्न न केल्यानं अनेक महिलांचे आयुष्य बिब्ब्यासारखे काळवंडलेले पहायला मिळते. अशा कामगार महिलांच्या भावनांचा कधी कोणीतरी विचार करेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT