Loha Shikshak Mitr Mandal
Loha Shikshak Mitr Mandal Images By Whatsup
नांदेड

लोहा शिक्षक मिञ मंडळाने महाजन कुटुंबाला केली अर्थिक मदत

बापू गायकर

लोहा (नांदेड) : मिञ सखा असतो, मित्र दोस्त असतो. अडीअडचणीला नात्यापेक्षाही अगदी काळजातला असतो तो मित्रच ! म्हणून त्याला जीवश्चकंठश्च असे म्हणतात. लोहा शहरातील शिक्षक सुनील महाजन यांचे कोरोनाने निधन झाले. कोरोना संसर्गाच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले.

लोहा शहरातील शिक्षण विभागाचे तंत्रस्नेही आदर्श शिक्षक सुनिल वसंतराव महाजन (वय 47) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (ता. 31) निधन झाले होते. शेलगाव (तालुका लोहा) येथील जिल्हा परिषद प्रशालेचे नूतनीकरण आणि डिजिटल शाळा रंगरंगोटी करण्यासाठी त्यांचा मोलाचा हातभार होता. लोहा शिक्षण विभागात आनंददायी शिक्षण प्रक्रियेत त्यांचा मोलाचा वाटा होता. सुनील महाजन हे अत्यंत संयमी, शांत आणि मित्रांचा कोंडावळा वाढवणारे शिक्षक म्हणून परिचित होते. जिल्हा परिषद शाळेचे सगळे शिक्षक एकत्र आले. आपल्या मित्रांसाठी कायपण. म्हणत तब्बल पावणे दोन लाख रुपये निधी जमा करून त्यांच्या कुटुंबांना सावरण्यासाठी एक हातभार लावला.

शुक्रवारी (ता. 16) सायंकाळी 5:00 वाजता जिवलग (आबा) मित्रमंडळाच्या वतीने जमा केलेली रक्कम (कै.)सुनील महाजन यांच्या कुटुंबियांना सुपुर्द करण्यात आली. जमा झालेली एकूण रक्कम एक लाख पंच्याहत्तर हजार सातशे पंधरा रुपयापैकी एक लाख रुपयाचा धनादेश व उर्वरीत रक्कम 75 हजार 715 रु. नगदी स्वरुपात देण्यात आले. यावेळी सुनील महाजन यांच्या पत्नी सिमाताई महाजन, मुलगा ओंकार व मुलगी अंजली तसेच महाजन यांचे दोन्ही बंधु अनिल व अतुल हे ही उपस्थित होते.

यावेळेस मिञमंडळातील बाबूराव फसमले, संतोष साखरे, पाराजी पोले, संतोष नराटे, अविनाश अवधुतवार, गजानन उप्परवाड, फारुख शेख, भागवत पदकोंडे आदी उपस्थित होते. हा जिव्हाळा व प्रेम सर्व मित्रांचा एकमेकांसाठी असावा. अशी धारणा या आबा मिञमंडळाची आहे. लोहा-कंधार तालुक्यातील मित्र मंडळींनी मदत केली ती मदत न विसरता येणारी आहे, अशा भावना महाजन परिवारातील होत्या.

'मिञांच्या आठवणी आणि कार्य फार महत्वाचे असते. शिक्षकांना येणाऱ्या अडचणी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत मिञत्व महत्वाची भूमिका असते. लोहा शिक्षक मिञ मंडळाने जोखीम जाणून अर्थिक मदत केली. यासाठी सुनील महाजन यांचे मोठे कार्य होते. अशा भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. कधीही न विसरणार हा मित्रपरिवार लोहा शहराला परिचित आहे. लोहा जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने एका चांगल्या शिक्षकाला आम्ही मुकलो आहोत. कुठल्याही शिक्षकावर संकटात गुधरले तर त्याच्या कुटुंबाला सावरण्यासाठी अशा मित्र मंडळाची ची गरज असते. कोरोना काळात सर्वत्र माणुसकी दाखवली पाहिजे. मित्रभाव जपत कुटुंबाला सावरले तरच आपण सगळे एकमेकाला सावरु शकतो. "

- रवींद्र सोनटक्के, गटशिक्षणाधिकारी, लोहा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC 2024 : AI ची कमाल! सात मिनिटांत सोडवला यूपीएससी प्रीलिम्सचा पेपर; किती मार्क मिळाले?

Rahul Gandhi Wayanad: राहुल गांधींचे ठरले! अखेर वायनाडचा 'हात' सोडला

Nashik Crime: रिक्षाचालकाचा पूर्ववैमनस्य अन्‌ आर्थिक वादातून दगडाने ठेचून खून; चौघांना पिंपरी चिंचवडमधून अटक

युएसएला मिळालं बक्षीस! मात्र सुपर 8 मधून बाहेर पडूनही पाकिस्तान 'या' कारणामुळं T20 World Cup 2026 साठी थेट पात्र

Samata Parishad : छगन भुजबळ वेगळी भूमिका घेणार? समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी?

SCROLL FOR NEXT