Nanded  sakal
नांदेड

Nanded : दहशतीसाठी गुन्हेगारांचा नवा फंडा ; गाड्या फोडण्याचे प्रमाण वाढले,पोलिस विभागाचे दुर्लक्ष

Criminals' new terror; The number of vandalism has increased, the neglect of the police department. | गल्लीबोळात आपली दहशत निर्माण व्हावी, आपल्याला सर्वसामान्यांनी ‘दादा’, ‘भाऊ’ म्हणावे यासाठी काही गुन्हेगारांनी नवा फंडा सुरू केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : गल्लीबोळात आपली दहशत निर्माण व्हावी, आपल्याला सर्वसामान्यांनी ‘दादा’, ‘भाऊ’ म्हणावे यासाठी काही गुन्हेगारांनी नवा फंडा सुरू केला आहे. गेल्या महिन्याभरापासून शहरातील विविध भागात रस्त्याच्या कडेला घरासमोर उभ्या असलेल्या वाहनतळातील चारचाकी, दुचाकी फोडण्याचे गैरकृत्य सुरू केले आहे.

पुण्याचे लोन आता नांदेडमध्येही पसरते की काय? अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. दुर्देवाची बाब म्हणजे पोलिस विभागाने या घटना गांभीर्याने घेतल्या नाहीत. केवळ गुन्हे दाखल करण्यापर्यंतच पोलीसांचे काम दिसून येत आहे. शहरातील पावडेवाडी रस्त्यावरील विस्तारीत यशवंतनगर येथे राजेश माधव पैंजणे (वय ५७) राहतात. त्यांचे चार चाकी वाहन (क्रमांक टीएस - ०९ जीसी - ७२७१) तसेच आणखी एक वाहन (एमएच - २४ बीआर - ४२७७) विस्तारीत यशवंतनगर येथील मोकळ्या प्लॉटवर उभे केले होते.

या गाड्याच्या काचा फोडुन अंदाजे १५ हजाराचे नुकसान केले. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशनगर भागातही घराच्या बाहेर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची रविवारी पहाटेच्या सुमारास तोडफोड करण्यात आली. एक गाडी न्यायाधिश यांची असल्याचे सांगण्यात आले. एका दुचाकीवरून आलेल्या तरूणांनी हे कृत्य केले. यात त्याच्या हातालाही दुखापत झाली आहे.

मागील जानेवारी महिन्यात देखील अशाच पद्धतीने दोन घटना घडल्या होत्या. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसंतनगर, आनंदनगर भागात दुचाकीवरून आलेल्या गुन्हेगारांनी या भागातील रहिवाशांच्या कार, दुचाकीच्या काचा फोडून धुमाकुळ घातला होता. जवळपास दहा ते बारा वाहनांच्या काचा फोडून लाखोंचे नुकसान केले होते. त्यापूर्वी हनुमानगड परिसरात देखील घरासमोरील वाहनांचे नुकसान केले होते. ह्या घटना ताज्या असतानाच विस्तारीत यशवंतनगर भागात कारच्या काचा फोडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाहने उभी करायची कुठे?

या वाढत्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याच्या प्रकारांमुळे आता वाहने कुठे उभी करायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनांच्या काचा फोडण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली असून पोलिसांनी अशा गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. घरासमोर रस्त्यावर ही वाहने उभी करण्यात आली होती. घरासमोर लावलेल्या वाहनाचे अशा पद्धतीने नुकसान होत असल्याने गाड्या कुठे लावाव्या? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT