पाझर तलाव झळकवाडी
पाझर तलाव झळकवाडी 
नांदेड

किनवटमधील झळकवाडी पाझर तलावाची दुर्दशा; तलावात पाण्याचा थेंब नाही, बांध झाडाझुडपांनी वेढला

विठ्ठल लिंगपूजे

शिवणी ( जिल्हा नांदेड ) : किनवट तालुक्यातील झळकवाडी (Kinwat zalakwadi) शिवणी या दोन गावच्या सिमेवर स्वर्गीय माजी खासदार उत्तमराव राठोड व स्वर्गीय माजी आमदार किशनराव पाचपुते (ex mp and ex mla rathod, pachpute build ) यानी त्यांच्या कार्यकाळात झळकवाडी- शिवणी या परिसरात तलावाची निर्मिती केली होती. दोन डोंगराच्या दऱ्यात या पाझर तलावाची निर्मिती झाल्याने पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर हा तलाव तुडुंब भरत होता. पाझर तलावाच्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना, जंगली व पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होईल या उद्देशाने या तलावाची निर्मिती केली. पण आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला फायदा झाला नाही. (The plight of Jhalakwadi Passer Lake in Kinwat; There is no drop of water in the pond, the dam is surrounded by bushes)

हा तलाव निर्मीती करते वेळेस तलावाच्या पूर्व बाजूस एक कालवा तयार करण्याचे कामही सुरु झाले. पण ह्या कालव्याचे काम पूर्ण न झाल्याने आज तो कालवा पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे. त्यामुळे कालवा पूर्ण न झाल्याने या तलावातील पाणी त्या कालव्यात आलेच नाही. लोखंडी साहित्याची चोरी होत असून या कालव्याला तलावाचे पाणी सोडण्यासाठी एक लोखंडी गेट बसवण्यात आला होता. पण हा गेट अज्ञातांनी बांधकाम केले असतानाही हे बांधकाम पूर्णपणे पाडून हा लोखंडी गेट लंपास केला आहे. या तलावाच्या बांधाला अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून या भागातून साचलेले पाणी पूर्णपणे वाहून जात आहे.

हेही वाचा - कोरोना पार्श्वभूमीवर अनाथ बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी टास्क फोर्स

हा बांध दूरवरुन पाहिला तर हा बांध नसून जंगल आहे असे वाटते. या बांधावर मोठमोठी झाडे- झुडपे झाली आहेत. शेतकरी गजाराम गंगाधर दारपवाड या तलावामुळे आम्ही आनंदी झालो होतो आम्हची शेती थोडी का होईना सिंचनाखाली येईल आणि शेती उत्पादनात वाढ होईल असे वाटत होते. पण या तलावापासून आम्हाला काहीच फायदा झाला नाही.

तसेच शेतकरी महेश कोंडलवाड म्हणले की, या तलावाच्या खालच्या बाजूला आमची शेती असल्याने या तलावाचा फायदा होईल पण तशे झाले नाही का तर या तलावात पावसाळ्याचे पाणी जमा होऊन आमची शेती सुपीक होईल असे वाटत होते पण आजपर्यंत अस काही झाल नाही. तलावात काही शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या पण या तलावात पाणीच राहत नसल्याने हे शेतकरी आपल्या जमिनी पुन्हा कसत असताना दिसत आहेत. यामुळे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी या पाझर तलावाकडे लक्ष देऊन या तलावाची दुरुस्ती करुन थोडी का होईना आमच्या जमिनी सिंचनाखाली आणाव्या अशी मागनी या परिसरातील शेतकरी करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

Latest Marathi News Live Update : 'अशा बिनकामाच्या गोष्टींवर मोदी नक्कीच बोलतील..'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याबाबत प्रियांका गांधींची प्रतिक्रिया

Game Of Thrones : लॅनिस्टर गादीचा वारस हरपला.. 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'या' कलाकाराचं निधन; पार्टनरची पोस्ट चर्चेत

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंधारे करणार तक्रार; प्रचार सभेतील भाषणावर घेतला आक्षेप

SCROLL FOR NEXT