Political atmosphere heats up sakal
नांदेड

नांदेड : राजकीय वातावरण थंडीत तापले

तीन नगरपंचायतीसह पोटनिवडणूक; किरीट सोमय्या, सचिन सावंत आज येणार

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात नायगाव, माहूर आणि अर्धापूर नगरपंचायतीची तसेच नांदेड वाघाळा महापालिकेच्या प्रभाग १३ ‘अ’ची पोटनिवडणुक होत आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐन थंडीत राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. कॉँग्रेस आणि भाजपाकडून एकमेकांवर आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे बुधवारी (ता. आठ) नांदेडच्या दौऱ्यावर येत आहेत तर त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत हे देखील बुधवारीच (ता. आठ) नांदेडच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात देगलूर - बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेसचे जितेश रावसाहेब अंतापूरकर विजयी झाले. त्यामुळे कॉँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. आता तीन नगरपंचायतीच्या निवडणुका आणि महापालिकेतील एका प्रभागाची पोटनिवडणुक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाआघाडी विरूद्ध भाजप असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. अद्याप तीन नगरपंचायत आणि एका पोटनिवडणुकीत महाआघाडी होणार की नाही? याबाबत अजूनही निर्णय झाला नाही तर दुसरीकडे भाजपने स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी सुरू केली आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण याबाबत काय निर्णय घेणार? तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेतेमंडळी व पदाधिकारी यांचाही निर्णय अजून झाला नाही.

किरीट सोमय्या आज दौऱ्यावर

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या बुधवारी (ता. आठ) नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे बुलढाणा अर्बन बँकेत भेट देणार असून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पोतगंटीवार यांच्याकडे सदिच्छा भेट देणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता आमदार राजेश पवार यांच्या कार्यालयाचे धर्माबाद येथे उद्‍घाटन करतील. दुपारी तीन वाजता नांदेड वाघाळा महापालिकेत विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत यांच्या दालनात भेट देऊन चर्चा करतील. सायंकाळी चार वाजता खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता खासदार कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. सहा वाजता नांदेडमधील काही साईटवर ते प्रत्यक्ष भेट देणार आहेत. रात्री आठ वाजता महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या निवासस्थानी भेट देतील.

प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत बुधवारी (ता. आठ) सकाळी साडेदहा वाजता जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित कार्यकर्ता संवाद कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार अमर राजूरकर यांच्या शिवाजीनगर येथील निवास्थानी भेट. सायंकाळी पाच वाजता नवा मोंढा येथील नांदेड काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद. गुरुवारी (ता. नऊ) सोयीनुसार हैद्राबादकडे प्रयाण करणार असल्याची माहिती कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: रेल्वेचा प्रश्न सोडवला आता पुढचा प्रश्न पाण्याचा! मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळ काय असतो हेसुद्धा मराठवाडा विसरून जाईल

Latest Marathi News Updates : उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल, मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी

Mohol News : मोहोळ पोलिसांनी उघड केल्या दोन चोऱ्या, लाखाचा माल हस्तगत चोरटा पोलीसांच्या ताब्यात

Nashik News : ५ कोटींचे बक्षीस: नाशिकच्या ग्रामपंचायतींना समृद्ध होण्याची सुवर्णसंधी

Onion Production : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अनुदान मिळणार? कांदा प्रश्नावर समितीकडून सकारात्मक हालचाल

SCROLL FOR NEXT